Maharashtra Assembly Election Results 2024 : बच्चू कडू यांचा पराभव, अचलपुरात धक्कादायक निकाल

महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीचे निकाल ( २३ नोव्हेंबर ) अखेर आज शनिवारी जाहीर होत आहे. राज्यात विधानसभा निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. राज्यातील २८८ विधानसभा निवडणूकीसाठीची मतमोजणी सुरु झाली आहे. आता एकामागोमाग निकाल जाहीर होत आहेत. अचलपूर येथून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर महायुती सोबत येणे पसंद केले होते. परंतू महायुती आघाडीत राहूनही बच्चू कडू यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका करणे सुरुच ठेवले होते. लोकसभा निवडणूकीच्या वेळी देखील बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रचार करीत त्यांना पाडण्यासाठी प्रयत्न केला होता. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा लोकसभेत नंतर पराभव झाला होता.

बच्चू कडू यांचा पराभव

आता विधानसभा निवडणूकीत अचलपूर येथून बच्चू कडू यांचा अनपेक्षित धक्कादायक पराभव झाला आहे. या ठिकाणी महायुतीचे उमेदवार प्रवीण वसंतराव तायडे यांचा विजय झाला असून ते १८,४८२ मतांनी आघाडीवर आहेत. साल २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत अचलपूर मध्ये प्रहार जनशक्ती संघटनेचे बच्चू कडू यांचा विजय झाला होता.

महायुतीचा झंझावात

महायुतीला विधानसभा निवडणूकीत स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे उमेदवार सकाळी मतमोजणी सुरु झाल्यापासून आघाडीवर आहेत. महायुतीचे उमेदवार १२५ जागांवर पुढे आहेत. तर शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उमेदवार ५६ जागांवर पुढे आहेत.तर राष्ट्रवादी अजितदादा यांच्या गटाचे उमेदवार ३९ जागांवर पुढे आहेत. भाजपाचे दोन उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे एक, अजितदादा गटाचे दोन उमेदवारांचा विजय जाहीर करण्यात आला आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)