खडसे-महाजन वाद विकोपाला, ‘त्या’ आरोपानंतर महाजनांनी उचललं मोठं पाऊल; आता थेट…

Girish Mahajan Vs Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील महाजन आणि खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. एका पत्रकाराच्या हवाल्याने गिरीश महाजन यांचे एका IAS महिला अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा केला होता. आता याच दाव्यानंतर महाजनांनी टोकाची भूमिका घेतली आहे.

महाजनांकडून कडसेंना नोटीस

एकनाथ खडसे यांनी आरोप केल्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंच्या नावाने अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटिशीच्या माध्यमातून महाजन यांनी खडसे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू केल्याचे म्हटले जात आहे. महाजनांनी दिलेल्या अब्रुनुकसानीच्या या नोटिशीत नेमकं काय आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र या नोटिशीला आता खडसे यांना कायदेशीर उत्तर द्यावं लागणार आहे.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले होते?

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराचे नाव घेत महाजन यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. खडसे यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा या पत्रकाराने केलेला आहे, असं खडसे यांनी म्हटलं होतं. तसेच महाजन यांच्या या संबंधाबाबत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांना कल्पना आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी शाहांनी महाजनांना बोलवून घेतलं होतं. या बैठकीत दिवसभरातून 100 वेळी तुमचे तिथे कॉल्स झालेले आहेत. हे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत, असे अमित शाह यांनी महाजनांना सांगितले होते,” असा दावा त्यांनी केला होता.

गिरीश महाजन फेटाळले होते आरोप

एकनाथ खडसे यांच्या दाव्यानंतर गिरीश महाजन यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईल. कोणालाही तोंड दाखवणार नाही, असे महाजन म्हणाले होते. तसेच भोंदू पत्रकाराच्या हवाल्याने खडसे हे आरोप करत आहेत. मी बोलायला लोगलो तर त्यांना घरातून तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल. मला बोलायला लावू नका. तुमच्याच घरातील एक गोष्ट सांगितली तर तुमचं बाहेर पडणं अवघड होऊन जाईल, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला होता.

त्यानंतर आता महाजन यांनी खडसेंना कायदेशीररित्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. या नोटिशीला खडसे काय उत्तरत देणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)