आपल्यालाही उत्तम आरोग्य मिळावं,दीर्घायुष्य लाभावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. उत्तम आरोग्यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. ज्यामध्ये पोषक आहाराचा जेवणात समावेश करणं. नियमित व्यायाम करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश होतो.अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी दीर्घायुष्यासाठी सहा सीक्रेट्स सांगितले आहेत, हे सहा असे सीक्रेट्स आहेत ज्यांना तुम्ही सहज फॉलो करू शकता.
श्रीराम नेने हे व्यवसायानं एक डॉक्टर आहेत. त्यांनी आपलं शिक्षण वॉशिंग्टन विद्यापीठातून पूर्ण केलं आहे. ते नियमितपणे आरोग्याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करत असतता. त्यांनी नुकतेच दीर्घायुष्यासाठीचे सहा सीक्रेट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.हे सीक्रेट्स तुम्ही सहज फॉलो करू शकतात, आणि त्याचं जर तुम्ही पालन केलं तर तुम्हालाही दीर्घायुष्य मिळू शकतं.जाणून घेऊयात त्या सहा गोष्टींबद्दल
हेल्दी फूड – डॉक्टर नेने यांनी सांगीतलं की जर तुम्हाला उत्तम आरोग्य हवं असेल तर तुम्ही दररोज काय खाता त्याकडे लक्ष द्या.आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश करा, पाले भाज्या आणि इतर पोषक तत्त्वाचा समावेश करा. ज्यामुळे तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
व्यायाम – डॉक्टर नेने म्हणतात की तुम्हाला जर म्हतारपणात देखील तरुण दिसायचं असेल तर तुम्ही नियमित व्यायाम करा.व्यायाममुळे फीट राहाण्यास मदत होते.
धूम्रपान करू नका – सिगारेटमुळे तुम्ही तरुणपणातच वृद्ध दिसू लागतात. तुमच्या चेहऱ्यावर त्याचा परिणाम होतो त्यामुळे धूम्रपान सोडा.
दारू पिऊ नका – जर तुम्हाला तुमचं लिव्हर निरोगी ठेवायचं असेल तर तुम्ही दारू सोडा किंवा दारूचं प्रमाण कमी करा असं डॉक्टर नेने यांनी सांगीतलं आहे.
तुमच्या चेहर्याला ताजे आणि टवटवीत ठेवण्यासाठी सनस्कीनचा वापर करा
तसेच हर्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी अति वाचार करू नका जास्त टेन्शन घेऊ नका असं नेने यांनी सांगितं आहे. अति विचारामुळे हर्ट अटॅक आणि इतर आजारांचा धोका वाढतो असं ते म्हणतात.