पुण्याच्या स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आढावा बैठक घेतली आहे. यात एसटी महामंडळात आयपीएस अधिकारी नेमणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दलची माहिती माधुरी मिसाळ यांनी दिली आहे.
स्वारगेट बसस्थानकात एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर बसस्थानकावरील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यानंतर आज मंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगेट बसस्थानकला भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर यावेळी परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्वारगटे बसस्थानक परिसरात जात संपूर्ण परिसराचा आढावा देखील घेतला. त्याचबरोबर याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांशी देखील त्यांनी चर्चा केली. त्यानंतर एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमण्याचा निर्णय माधुरी मिसाळ यांनी घेतला आहे.