आजारी पडल्यावर आपण प्रत्येकजण डॉक्टरांचा सल्ला घेत असतो. तसेच योग्य तपासण्याकरून आजारावर मत करण्यासाठी डॉक्टर औषधं देतात. तुम्ही जेव्हा गोळ्या घेतात तेव्हा तुमच्या लक्षात आले असेल की अनेक गोळ्यांच्या मध्ये एक रेष असते. ही रेष बहुतेक गोळ्यांमध्ये असते, तर काही गोळ्यांमध्ये नसते. गोळ्यांच्या मध्यभागी ही रेष का केली जाते आणि या रेषेला काय म्हणतात. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर आज आम्ही तुम्हाला ही रेष का असते आणि तिचा अर्थ काय आहे ते सांगणार आहोत.
औषधांच्या गोळ्यांच्या मध्यभागी असलेल्या रेषेला स्कोअरिंग लाइन म्हणतात. गोळ्यांवर मधोमध असलेल्या रेषेचा अर्थ असा, की ही गोळी मधोमध तोडून तिचा अर्धा डोस तुम्ही घेऊ शकता. काही गोळ्या अधिक पॉवरच्या असतात. त्यामुळे त्या गोळीचा निम्मा डोस तुम्हाला कळावा, यासाठी ही रेष आखलेली असते. गोळ्यांच्या या रेषेशिवाय, गोळी मधून तोडणे कठीण होते आणि जर गोळी चुकीच्या पद्धतीने तोडली गेली तर डोसमध्ये गोंधळ होण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमच्या तब्येतीवर याचा परिणाम होऊ शकतो. अशावेळी एखाद्या गोळीचा निम्मा डोस घेतल्यानंतर उरलेली अर्धी गोळी नीट ठेवावी. समजा त्या अर्ध्या गोळीला हवा किंवा घाण लागली असेल, तर ती गोळी घेणं टाळावं.
डॉक्टरांच्या मते, लोकांच्या शरीराच्या वजनानुसार अनेक औषधे दिली जातात. समजा एखाद्या व्यक्तीचे वजन 80 किलो असेल तर त्याला 1000 मिलीग्राम गोळी घेण्याचा सल्ला दिला जातो. तर 40 किलो वजनाच्या व्यक्तीला 500 मिलीग्राम गोळीची आवश्यकता असते. हे सर्व गोळ्यांच्या बाबतीत होत नाही, परंतु अनेक औषधे देखील अशा प्रकारे वापरली जाऊ शकतात. बऱ्याच औषधांमध्ये स्कोअरिंग लाइन नसतात आणि त्यांना तोडणे योग्य नसते.
काही औषधांमध्ये स्कोअरिंग लाइन का नसतात? या प्रश्नावर, डॉक्टरांनी सांगितले की सर्व गोळ्यांना स्कोअरिंग लाइन नसते, कारण ती पूर्णपणे औषधाचा प्रकार, डोस आणि रचना यावर अवलंबून असते. स्कोअरिंग लाइन ज्या गोळ्यांवर असते त्या गोळ्या दोन समान भागात विभाजित करणे सोपे होते. काही गोळ्यांचा डोस खूपच कमी असतो, जिथे डॉक्टर दिवसातून एकदा औषध घेण्याचा सल्ला देतात. बऱ्याच गोळ्या या स्लो-रिलीझ असतात आणि त्या तुमच्या मनाप्रमाणे अर्धी तोडून वापरल्या जाऊ शकत नाहीत कारण यामुळे त्यांच्या परिणामकारकतेवर परिणाम होऊ शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)