उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे हे एका मोठ्या आव्हानापेक्षा कमी नाही. या ऋतूत उष्णतेमुळे शरीराला लवकर थकवा जाणवू लागतो. पण योग्य व्यायाम दिनचर्या आणि काही खबरदारी घेतल्यास उन्हाळ्यात निरोगी तसेच सक्रिय राहता येते. तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात असे व्यायाम निवडले पाहिजेत जे शरीराला जास्त थकवणार नाहीत आणि तंदुरुस्ती राखण्यास मदत करतील.
जर तुम्हाला तंदुरुस्त आणि सक्रिय राहायचे असेल तर तुमच्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जास्त तेलकट आणि मसालेदार अन्नापासून दूर राहा. उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी आपण कोणते व्यायाम आपण कोणते व्यायाम केले पाहिजेत. ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊया.
चालणे आणि जॉगिंग
तंदुरुस्त राहण्यासाठी चालणे किंवा जॉगिंग करणे खूप फायदेशीर आहे. हे दोन्ही व्यायाम हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य सुधारतात. तसेच तुम्ही जर दररोज चालात किंवा जॉगिंग केलात तर तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतात आणि वजन कमी करण्यास मदत होते. उन्हाळ्यात, सकाळी आणि संध्याकाळी 6 नंतरचा वेळ हा व्यायामासाठी चांगला असतो.
पोहणे
पोहणे केवळ शरीराला थंडावा देत नाही तर ते संपूर्ण शरीरासाठी एक कसरत देखील आहे. हे स्नायूंना टोन देते, तग धरण्याची क्षमता वाढवते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. तसेच यामुळे सांध्यांवर जास्त दबाव येत नाही.
योग आणि प्राणायाम
उन्हाळ्यात योगा आणि प्राणायाम करणे खूप फायदेशीर आहे. सूर्यनमस्कार, ताडासन, भुजंगासन, अनुलोम-विलोम आणि कपालभाती यांसारखी आसने शरीराला डिटॉक्स करतात. योगामुळे मानसिक ताण कमी होतो आणि शरीराची लवचिकता टिकून राहते.
घरातील वर्कआऊट
जर बाहेर खूप उष्णता असेल तर तुम्ही घरी वर्कआऊट करू शकता. तर यासाठी तुम्ही पुश-अप्स, स्क्वॅट्स, लंग्ज, प्लँक्स आणि बर्पीज सारखे शरीराच्या वजनाचे व्यायाम कोणत्याही लहान जागेत करता येतात. याशिवाय, अनेक ऑनलाइन फिटनेस क्लासेस देखील उपलब्ध आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता आणि प्रोफेशनल्सच्या मार्गदर्शनाखाली वर्कआऊट करू शकता.
या गोष्टी लक्षात ठेवा.
हायड्रेशनची काळजी घ्या – उन्हाळ्यात आपल्याला जास्त घाम येतो. ज्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. म्हणून, दिवसभर भरपूर पाणी प्या.
हलके कपडे घाला – व्यायाम करताना सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घाला जेणेकरून शरीर थंड राहील.
उन्हात जाणे टाळा – विशेषतः दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान, बाहेर उन्हात व्यायाम करणे टाळा.
तुमच्या आहाराची काळजी घ्या – हिरव्या भाज्या, फळे, दही आणि हलके अन्न खा जेणेकरून शरीर थंड राहील आणि ऊर्जा टिकून राहील.
उन्हाळ्यात तंदुरुस्त राहणे कठीण नाही, फक्त थोडी समज आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. तुमच्या शरीराचे ऐका, स्वतःला जास्त भार देऊ नका. उन्हाळ्यात तंदुरुस्त राहण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)