तुम्ही देखील उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवताय? जाणून घ्या दुष्परिणाम

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अन्न लगेच खराब होत म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय अनेकांना असते. पण खरंच असं करणे आपल्यासाठी सुरक्षित आहे का? विशेषतः गरम आणि दमट वातावरणात, जेव्हा तापमान जास्त असतं, तेव्हा शिल्लक अन्न फ्रिजमध्ये ठेवताना काही गोष्टींच्या बाबतीत दुर्लक्ष केल्यास ते आपल्या आरोग्यावर मोठा परिनाम करु शकतं.

गर्मीमुळे धोका का वाढतो

उन्हाळ्यात वातावरण उष्ण आणि दमट असते. या परिस्थितीत, बॅक्टेरिया आणि इतर सूक्ष्मजंतूंची वाढ फार झपाट्याने होऊ लागते. जरी अन्न थोड्या वेळासाठी बाहेर राहिलं, तरी त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. शिजवलेलं गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणे म्हणजे मोठा धोका. गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवल्याने, फ्रिजमधल्या थंड तापमानात बदल होतो आणि ओलसरपणा वाढतो. या ओलसर वातावरणात बॅक्टेरिया वाढतो, ज्यामुळे अन्न खराब होण्याचा वेग वाढतो आणि ते खाल्ल्यामुळे पोट बिघडण्याचा धोका वाढतो.

अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी करा “या” गोष्टी

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिजवलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवण्यापूर्वी त्याला खोलीच्या सामान्य तापमानात पूर्णपणे थंड होऊ द्यावं. गरम किंवा कोमट अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवणं टाळा. अन्न थंड झाल्यावरच, त्याला स्वच्छ आणि हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा. यामुळे फ्रिजमधील वातावरण आणि अन्नाची गुणवत्ता दोन्ही सुरक्षित राहतात.

उन्हाळ्यात फ्रिज वापरण्याच्या काही महत्त्वाच्या टिप्स

तुमच्या फ्रिजचं तापमान नेहमी ४°C किंवा त्यापेक्षा कमी ठेवा. यामुळे बॅक्टेरियाची वाढ मंदावते.

डाळ, आमटी, रस्सा भाजी यांसारखे पाणी किंवा तेल जास्त असलेले पदार्थ फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवू नका. शक्यतो दुसऱ्या दिवशी ते संपवून टाका.

शिजवलेलं अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ खोलीच्या तापमानात राहिलं असेल, तर ते फ्रिजमध्ये ठेवू नका आणि थेट फेकून द्या.

अन्नाचा वास किंवा चव बदलली असेल, त्याला आंबट वास येत असेल, किंवा त्यावर बुरशी दिसत असेल, तर ते अन्न खाणं टाळा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)