उन्हाळ्यात कॉटनचे कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Tips and tricks how to wash cotton clothes in summerImage Credit source: tv9 marathi

उन्हाळा सुरू झाला की आपण आरोग्याची काळजी घेण्यास सुरूवात करतो. तसेच या हंगामात दमट हवामानामुळे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये तसेच त्यांच्या कपड्यांमध्येही बदल होतो. कारण उन्हाळ्यात घाम आणि आर्द्रतेमुळे, बहुतेक लोकं असे कपडे घालतात ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होतो आणि घाम देखील शोषला जातो. तर अशावेळेस बहुतेकजण कपड्यांमध्ये सुती कपडे सर्वाधिक पसंत केले जाते. कॉटन हे एक असे कापड आहे जे उन्हाळ्यात घालण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. त्याचे अनेक प्रकार आहेत. जसे लिनेन कापूस, प्युअर कापूस, मसलिन कापूस आणि मद्रास कापूस.

उन्हाळ्यात सुती कपडे घालायला खूप मजा येते. पण जेव्हा ते धुतले जाते तेव्हा त्याचा रंग निघून जातो आणि कपडे खूप लवकर जुने दिसू लागतात. अशा परिस्थितीत, सुती कपडे धुण्याची योग्य पद्धत जाणून घेणे महत्वाचे आहे. उन्हाळ्यात सुती कपडे कसे धुवावेत जेणेकरून ते नवीन असल्यासारखे दिसतील हे आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात…

नवीन कॉटनचे कपडे खरेदी केल्यानंतर काय करावे?

जेव्हा तुम्ही रंगीत नवीन कॉटनचे कपडे खरेदी करता तेव्हा ते घालण्यापूर्वी धुणे खूप महत्वाचे आहे. कारण कारखान्यात त्यावर अनेक प्रकारची कॅमिकल लावली जातात जी त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. तसेच, रंगीत कपडे पहिल्यांदा धुण्यापूर्वी, थंड पाण्यात एक चमचा मीठ किंवा अर्धा कप पांढरा व्हिनेगर मिक्स करून ते 15-30 मिनिटे भिजवा. या प्रक्रियेमुळे कापडाचा रंग स्थिर राहतो आणि भविष्यात रंग फिकट होण्याची शक्यता कमी होते.

पाण्याचे तापमान योग्य ठेवा

तुम्हाला जर तुमच्या कॉटनच्या कपड्यांचा रंग फिकट होऊ नये असे वाटत असेल तर नेहमी योग्य पाण्याचे तापमानाचे नीट ठेऊन त्यात कॉटनचे कपडे धुवा. यासाठी फक्त थंड पाणी वापरा. गरम पाण्यामुळे कॉटनचे तंतू कमकुवत होतात आणि कपडे आकुंचन पावू शकतात किंवा त्यांचा रंग फिकट पडू शकतो.

योग्य डिटर्जंट वापरा

कॉटनचे कपडे खूप नाजूक असतात. हेवी कॅमिकल रसायने असलेले डिटर्जंटचा वापर केल्याने या कपडयांचा रंग लवकर फिकट होऊ शकतो. म्हणून, सौम्य, द्रव किंवा हर्बल डिटर्जंटचा वापर करा. जर तुम्ही हाताने कपडे धुत असाल तर प्रथम डिटर्जंट पाण्यात चांगले विरघळवा आणि नंतर त्यात कॉटनचे कपडे भिजवून धुवा.

कपडे धुण्याची योग्य पद्धत

वेगवेगळ्या रंगांनुसार कपडे क्रमवारी लावा. जसे की गडद आणि हलके रंग एकत्र धुवू नका. कॉटनचे कपडे जास्त घासू नका, यामुळे त्यांचे धागे कमकुवत होऊ शकतात. जर डाग असतील तर प्रथम डाग असलेला भाग हलका धुवा, नंतर संपूर्ण कापड धुवा. जर मशीनने धुत असाल तर जेंटल मोड किंवा डेलिकेट सायकल मोड वापरा.

सुकवण्याचा योग्य मार्ग

कपडे थेट उन्हात वाळवू नका. यामुळे रंग फिकट होऊ शकतो. कपडे उलटे करा (आतून बाहेरून) आणि सावलीत वाळत घाला. शक्य असल्यास कपडे दोरीवर वाळत घालण्याऐवजी ते जमीनवर वाळत घाला. जेणेकरून त्यांचा आकार बदलणार नाही. सुकल्यानंतर, कपडे जास्त वेळ क्लिपवर लटकवू नका, अन्यथा कडा ताणल्या जाऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)