उन्हाळा ऋतू त्वचेशी संबंधित अनेक समस्या घेऊन येतो. या दमट हवामानात चेहऱ्यावर चिकटपणापासून ते मुरुमांपर्यंतच्या समस्या प्रत्येकाला सतावत असतात. तर अशा समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लोकं अनेक प्रकारच्या स्किनकेअरचा वापर करतात. काही लोकं घरगुती उपचारांचा अवलंब करतात तर काहीजण बाजारातील प्रॉडक्ट खरेदी करून त्वचेवर वापरतात. यापैकी एक पद्धत जी खूप लोकप्रिय आहे ती म्हणजे चेहऱ्यावर बर्फ लावणे. उन्हाळ्यात चेहऱ्यावर बर्फ लावण्याचे अनेक फायदे मिळतात. जसे की ते रक्ताभिसरण सुधारते आणि चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास देखील मदत करते.
तुम्ही तुमचा चेहरा बर्फाच्या पाण्यात बुडवून किंवा बर्फाच्या तुकड्यांनी चेहऱ्यावर मसाज करून आइस फेशियल करू शकता. पण तुमच्या स्किनटोननुसार जर तुम्ही बर्फाने मसाज केल्यास धोकादायक ठरू शकते. म्हणून, प्रथम तुमच्या त्वचेचा प्रकार काय आहे ते जाणून घ्या आणि त्यानुसार तुम्ही बर्फात काही गोष्टी मिसळून ते वापरू शकता. स्किनटोननुसार बर्फात काय मिक्स करावे ते जाणून घेऊया…
कोरडी त्वचा असलेल्यांसाठी
कोरडी त्वचा असलेल्यांनी गुलाबपाणी, काकडी आणि मध मिसळून त्यापासून बर्फ बनवा आणि ते त्वचेवर वापरा. गुलाबपाणी त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि काकडी त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यासाठी तुम्हाला फक्त काकडीचा रस, मध आणि गुलाबजल एका बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवावे लागेल आणि ते फ्रीजरमध्ये ठेऊन बर्फ तयार झाल्यावर चेहऱ्यावर मसाज करा.
तेलकट त्वचा असलेल्यांसाठी
तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी, लिंबू आणि कोरफड हे खूप प्रभावी आहेत. उन्हाळ्यात तेलकट त्वचेपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही या तीन गोष्टींपासून बर्फ बनवू शकता आणि त्वचेवर वापरू शकता. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचा चमकदार आणि स्वच्छ करते.
ज्यांची त्वचा कोरडी आणि तेलकट अशी असलेल्यांसाठी
ज्यांची त्वचा कोरडी आणि तेलकट आहे त्यांच्यासाठी ग्रीन टी आणि कोरफडीचा वापर प्रभावी ठरू शकतो. हे तुमच्या त्वचेतील तेल संतुलित करण्यास मदत करते आणि त्वचेला मॉइश्चरायझ करते. यासाठी तुम्हाला एका कप ग्रीन टीमध्ये एलोवेरा जेल मिसळून बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवावे लागेल. यानंतर, बर्फ कापडात गुंडाळा आणि चेहऱ्यावर मसाज करा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)