आजकाल बहुतेक लोकं त्यांच्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये खूप व्यस्त आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. अनेक वेळा कामाशी संबंधित किंवा वैयक्तिक जीवनाशी संबंधित उद्भवणाऱ्या समस्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे लोकं लवकर थकतात आणि त्यांना विश्रांतीची आवश्यकता असते. पण त्यांना विश्रांतीसाठी वेळ मिळत नाही. याशिवाय, आजकाल लोकं तासंतास मोबाईल पाहत असतात. त्यामुळे अनेकजणांना रात्री उशिरा झोपण्याची सवय लागलेली आहे, बरेच लोकं म्हणतात की त्यांना वेळेवर झोप येत नाही. अशा परिस्थितीत, रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही काही योगासने केल्यास तुम्हाला लवकर झोप येण्यास मदत होईल. तसेच तुम्हाला मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील.
तुम्ही जर रोज योगासने केल्यास रोजच्या धावपळीमुळे जाणवणारा थकवा कमी होण्यास आणि शांत झोप येण्यास मदत होते. काही योगासने अशी आहेत जी शरीराला आराम देण्यास, तणाव कमी करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करू शकतात. प्रत्येक योगासनाचे वेगवेगळे फायदे आहेत. अशा परिस्थितीत, ऑफिसमधून घरी पोहोचल्यानंतर, झोपण्यापूर्वी तुम्ही काही योगासन करू शकता. जे शारीरिक आणि मानसिक ताण कमी करण्यास आणि झोप आणण्यास मदत करू शकते. कोणते आहेत ही योगासने ते जाणून घेऊयात…
यावेळी योग तज्ञ डॉ. संपूर्णा सांगतात की, हा प्राणायाम करण्यापुर्वी सर्वप्रथम झोपण्याच्या 1 तास आधी फोन वापर करू नका. तुम्ही रोज झोपण्याआधी भ्रामरी प्राणायाम करा. कारण या प्राणायाममुळे तुमचा दिवसभरात आलेला ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. हा प्राणायाम करताना बेडवर झोपा, डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. फक्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे शरीर मोकळे ठेवा. यामुळे दिवसभराचा थकवा आणि ताण दूर होण्यास मदत होईल.
शवासन योग
शवासन तणाव आणि थकवा दूर करण्यास देखील मदत करते. हे करण्यासाठी, बेडवर पाठीवर झोपा. यानंतर, तुमचे हात शरीराच्या दोन्ही बाजूंना ठेवा. शरीर सैल ठेवा आणि नंतर तुमचे तळवे वरच्या दिशेने वळवा. आता डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही हे 3 ते 5 मिनिटे करू शकता.
लेग्स अप वॉल पोज
भिंतीच्या आधाराने पाय वर करण्याच्या आसनाला लेग्स अप वॉल पोज म्हणतात. हे आसन करण्यासाठी, पाठीवर झोपा. यानंतर, तुमचे कंबर भिंतीजवळ ठेवा आणि तुमचे पाय भिंतीवर 90 अंशांपर्यंत वर करा. तुमचे शरीर सैल सोडा, डोळे बंद करा आणि तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. हे आसन थकवा कमी करण्यास आणि झोप सुधारण्यास मदत करेल.
पीसीओडी आणि वंध्यत्वाच्या समस्यांसाठी हे योगासन खूप फायदेशीर आहे. तसेच, ज्यांना झोप येत नाही आणि जे दिवसभर ऑफिसमध्ये खुर्चीवर बसून काम करतात किंवा खूप प्रवास करतात, ज्यामुळे पाय खाली लटकतात आणि त्यामुळे पायांना सूज येते, त्यांच्यासाठी हे आसन करणे चांगले आहे. हे अन्न पचवण्यास देखील मदत करू शकते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)