आजकालचे बदलते वातावरण आणि बदलते जीवनशैली यामुळे अनेकांच्या आरोग्यावर त्यांचे परिणाम होत आहे. त्यातच महिलांवर्ग सर्वाधिकरित्या आजारी पडत असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. यामुळे महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. कारण महिलांना असे वाटते की सौम्य आजारांची लक्षणे सामान्य आहेत आणि त्या स्वतःहून बऱ्या होतील, परंतु भविष्यात ही निष्काळजीपणा गंभीर रूप धारण करू शकते. अशा परिस्थितीत महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की बहुतेक महिला त्यांचा थकवा, ताणतणाव आणि शरीरातील किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे त्या अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडू शकतात. दिल्लीतील श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी बन्सल म्हणतात की, आजकाल असे दिसून येते की तरुण मुली आणि गर्भवती महिलांमध्ये अशक्तपणा तसेच शरीरात रक्ताची कमतरता याची समस्या खूप सामान्यरित्या दिसून येत आहे, यामागील मुख्य कारण म्हणजे शरीरात लोह आणि फॉलिक अॅसिडची कमतरता असणे, ज्यामुळे महिलांमध्ये अशक्तपणा, चक्कर येणे आणि थकवा यासारख्या समस्या सतावत असतात. त्यांच बरोबर महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे, हे चिंतेचे कारण असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मीनाक्षी बन्सल यांनी सांगितले.
महिलांचे मानसिक आरोग्यही बिघडते
गेल्या काही वर्षांपासून महिलांमध्ये पीसीओडी, थायरॉईड सारखे आजार वाढत आहेत. याचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मानसिक आरोग्यावरही होतो, ज्यामुळे नैराश्य आणि चिडचिडेपणासारख्या समस्या वाढत आहे. तसेच महिलांमध्ये चिंता, नैराश्य आणि ताण यासारख्या समस्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढत असल्याने महिलांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाच्या समस्या वाढत आहेत. चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाच्या अभावामुळे हे घडत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहेत.
महिला स्वतःला कसे निरोगी ठेवू शकतात?
डॉ. सुनीता शर्मा यांनी सांगितले की महिलांनी संतुलित आहार घेणे आणि हिरव्या भाज्या खाणे महत्वाचे आहे. तसेच महिलांनी त्यांच्या आहारात फळांचा समावेश करा आणि भरपूर पाणी प्या. जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर ज्या महिलांना बाहेरील तळलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणात सेवन करत असतील तर त्यांनी यांचे सेवन करणे टाळा, कारण त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम करा. तसेच मानसिक आरोग्य गांभीर्याने घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
आयुष्यात आनंदी राहण्यास शिका आणि ताणतणावाला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. महिलांनी त्यांच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेतले पाहिजे आणि त्याला प्राधान्य दिले पाहिजे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)