Kunal Kamra Video : कुणाल कामरा याच्या अडचणीत वाढ, पोलीस घरी पोहचले

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात पॅरीडी गाण्यातून टीका केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरा याच्या अडचणी वाढल्या आहेत. कुणाल कामरा याचा शो व्हायरल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ स्टुडिओत जाऊन तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर कुणाल कामरा याच्या विराधात मुंबईच्या खार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. अखेर खार पोलिसांनी कामरा याला जबाब नोंदविण्यासाठी पाचारण केले. परंतू त्याने येण्यास, नकार दिल्याने मुंबई पोलीस कामरा याच्या दादर येथील निवासस्थानी गेली आहे. याचा व्हिडीओ एएनआयने व्हायरल केला आहे.

येथे पोस्ट पाहा –

कुणाल कामरा याच्यावर अनेक केसेस

शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर २४ मार्च रोजी कामरा याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कुणाल कामरा याला दोनदा समन्स बजावण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या मते कामरा याच्याविरोधात खार पोलिस ठाण्यात तीन वेग-वेगळे केस दाखल झाल्या आहेत. एक तक्रार जळगावातील महापौरांनी दाखल केली आहे. अन्य दोन केसेस नाशिकचे हॉटेल व्यावसायिक आणि एक व्यापाऱ्यांनी दाखल केल्या आहेत.

काय आहे प्रकरण

23 मार्च रोजी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने साल १९९७ चा चित्रपट ‘दिल तो पागल है’ मधील एका गावाचा पॅरीडी साँग तयार करुन त्यातून एकनाथ शिंदे यांना डिवचले. त्यानंतर या प्रकरणात शिवसैनिकांना कुणाल कामरा याने माफी मागावी अशी मागणी लावून धरली,त्याच्या काही मिनिटांच्या आतच हॉटेल मध्ये जाऊन सेटची तोडफोड केली. त्यानंतर काही दिवसांना हॅबिटेट स्टुडिओच्या काही भागाचे बांधकाम बीएमसीच्या पथकाने जाऊन पाडले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)