Kunal Kamra : काय उखाडायचं ते उखाडा ! शिवसैनिकांच्या तोडफोडीनंतर कुणाल कामराने दिलं थेट आव्हान

कुणाल कामरा आक्रमकImage Credit source: social media

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका गाण्यातून टीका करणारा , स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतील एका शोमध्ये त्याने महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी जो भूकंप घडला आणि एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं , शिवेसेनेतून बाहेर पडले, त्यावर विडंम्बनात्मक गाण्यातून भाष्य केलं आहे. त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव न घेताच त्यांच्यावर टीका केली. त्याचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून नव्या वादाला तोंड फुटलं.

मात्र यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांचं डोकं फिरल्याने काल रात्रीच खवळलेल्या शिवसैनिकांनी द युनिकॉन्टीनेंटेल हॉटेलमध्ये तोडफोड केली. चहूबाजूंनी कुणाल कामरावर टीकेची झोड उठली आहे. मात्र या वादानंतरही कुणालने ‘अपुन झुकेगा नही’ अशीच भूमिका घेतली असून तो सध्या मुंबईतून फरार झाल्याचे वृत्त आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर कुणालनेही आक्रमक भूमिका घेतली असून ‘मी पाँडिचेरीला आहे, काय उखाडता ते उखाडा’ अशी धमकीच त्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे.

वादानंतर केला संविधानाचा फोटो ट्विट

एवढंच नव्हे तर कुणालने साधारण 8 तासांपूर्वी X ( पूर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया नेटवर्किंग साईटवरील त्याच्या अधिकृत अकाऊंटवर एक फोटोही ट्विट केला आहे. शिवसैनिकांनी त्याला माफी मागायला सांगितलेली असतानाच प्रत्युतेतर देतानाच कुणालने एक पोस्ट केली आहे. त्याने संविधानाची एक प्रत हातात असलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच, “The only way forward…” अशी कॅप्शनही त्याने त्यासोबत लिहिली आहे. त्याच्या या भूमिकेमुळे हा वाद लवकर न शमता आणखीनच पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

संजय राऊतांनीही केलं ट्विट

कॉमेडियन कुणाल कामरा याने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायलं. दिल तो पागल है चित्रपटातील भोलीसी सूरत या गाण्याच्या चालीवर कुणालने त्याचं विडंबनात्मक गीत गायलंय. “महाराष्ट्र इलेक्शन में इन्होने जो किया है बोलना पडेगा. यहांपे पहले इन्होने क्या किया? शिवसेना बीजेपीसे बाहर आ गयी. उसके बाद शिवसेना शिवसेनासे बाहर आ गयी, एनसीपी एनसीपी बाहर आ गयी. एक व्होटर को नौ बटन दे दिये. सब कन्फ्युज हो गये. चालू एक जन ने किया था. वो मुंबईमें एक बहोत बढिया डिस्ट्रिक्ट है थाने. वहाँ से आते है..” अशी सुरूवात करत नंतर कुणालने ते गाण गायलं, त्याचा व्हिडीओही त्याने त्याच्या अकाऊंटवर शेअर केला होता. ‘ कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!’ असं लिहीत संजय राऊतांनी कुणालचं कौतुक केलं आणि तो व्हिडीओही शेअर केला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)