बदाम की शेंगदाणे आरोग्यासाठी कोण अधिक फायदेशीर? जाणून घ्या

बदाम की शेंगदाणे , अधिक फायदेशीर काय ?

आजकाल बहुतेक लोकं बदलत्या जीवनशैलीमुळे व वातावरणातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतात आणि आहारात सुपरफूड्सचा समावेश करतात. अशातच अनेकजण नट्स आणि सीड्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानतात पण जेव्हा बदाम आणि शेंगदाण्याचा विचार येतो तेव्हा लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न पडतो की यापैकी कोणते जास्त फायदेशीर आहे? बरेच लोकं बदामांना आरोग्यदायी मानतात, तर काही लोक शेंगदाणे हे प्रथिनांचा स्वस्त आणि चांगला स्रोत मानतात.

पण बदाम खरोखरच शेंगदाण्यापेक्षा अधिक फायदेशीर आहेत का, किंवा शेंगदाण्यामध्ये काही विशेष गुणधर्म आहेत ज्यामुळे ते बदामापेक्षा स्वस्त आणि चांगला पर्याय ठरतील? जर तुम्हालाही बदाम आणि शेंगदाणे यापैकी कोणते आरोग्यासाठी चांगले आहे याबद्दल द्विधा मनस्थितीत निर्माण झाली असेल, तर या लेखात आम्ही तुम्हाला आरोग्यासाठी कोणते अधिक फायदेशीर आहे ते सांगणार आहोत. चला जाणून घेऊयात…

बदामाचे फायदे

बदामांमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आरोग्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करतात . म्हणूनच आपण लहानपणा पासूनच मुलांना बदाम खायला देतो.

बदाम हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण यात मोनो-सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे कोलेस्टेरॉल नियंत्रित करून हृदय निरोगी ठेवतात. बदामाच्या सेवनाने हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.

बदामाच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. बदामांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात. तुम्ही जर बदाम दुधामध्ये घालून प्यायले तर ते आरोग्यासाठी व हाडांसाठी आणखी फायदेशीर ठरते.

वजन कमी करण्यास मदत करणाऱ्या बदामांमध्ये फायबर आणि हेल्दी फॅट असतात, ज्यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते आणि जास्त खाण्यापासून बचाव होतो. यामुळे वजन कमी करणे सोपे होते.

शेंगदाण्याचे फायदे

शेंगदाणे हे प्रथिनांचे स्वस्त आणि उत्कृष्ट स्रोत आहेत आणि त्यात बदामांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने असतात, ज्यामुळे स्नायू तयार होण्यास आणि शरीर मजबूत होण्यास मदत होते. जिममध्ये जाणारे लोकं शेंगदाणे जास्त सेवन करतात.

बदामांप्रमाणेच शेंगदाणे देखील हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. शेंगदाण्यामध्ये असलेले ओमेगा-6 फॅटी ॲसिड हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते.

शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी असल्याने ते मधुमेहाच्या रूग्णासाठी फायदेशीर आहेत , कारण यांच्या सेवनाने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते.

शेंगदाण्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात आढळते. याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुम्हाला उच्च किंवा कमी रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही ते खाऊ शकता.

कोण जास्त फायदेशीर आहे?

आता प्रश्न असा उद्भवतो की या दोघांपैकी कोणते जास्त फायदेशीर आहे? याचे उत्तर तुमच्या गरजा आणि बजेटवर अवलंबून आहे. जर तुम्हाला निरोगी त्वचा, केस आणि मजबूत हाडांसाठी काही हवे असेल तर बदाम सर्वोत्तम आहेत. त्याच वेळी, जर तुम्ही स्नायू वाढवण्याचा आणि स्वस्त प्रथिनांचा स्रोत शोधत असाल, तर शेंगदाणे तुमच्यासाठी योग्य आहेत. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी बदाम चांगले आहेत कारण त्यात हेल्दी फॅट आणि फायबर भरपूर असतात. ज्या लोकांना जास्त कॅलरीज बर्न करायच्या आहेत आणि एनर्जी बूस्टरची आवश्यकता असते त्यांच्यासाठी शेंगदाणे चांगले स्रोत आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)