माऊंट एव्हरेस्टजवळ सापडतायत किंग कोब्रा? दीड महिन्यात सापडले 10 साप, ग्लोबल वार्मिंग की आणखी काय ?

साप शक्यतो उष्ण प्रदेशात आढळतात. परंतू आता माऊंट एव्हरेस्ट जवळ देखील साप सापडू लागल्याने खळबळ उडाली आहे. नेपाळची राजधानी काठमांडूत हिरव्या गार खोऱ्यात गेल्या दीड महिन्यांपासून १० विषारी साप सापडल्याने खळबळ उडाली आहे. या ९ तर किंग कोब्रा आणि एक मोनोकल कोब्रा यांचा समावेश आहे.

विषारी सर्प शक्यतो उष्ण आणि सपाट प्रदेशात आढळतात. परंतू आता ते थंडगार प्रदेशात सापडू लागल्याने खळबळ उडाली आहे.नेपाळची काठमांडूपासून सरळ रेषेत १६० किमी अंतरावर जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेट आहे. येथे विषारी सांप सापडल्याने पर्यावरण तज्ज्ञ हैराण झाले आहेत. काठमांडू पोस्टच्या नुसार या क्रोबांना गुपालेश्वर, भांज्यांग, सोखोल आणि फुलचौक सारख्या भागातून रेस्क्यु करण्यात आले आहे. हे साप घर, अंगणात आणि एवढेच काय निवासी विभागात शिरले आहेत. वन विभाग आणि सर्पमित्रांद्वारे त्यांना पकडण्यात आले आहे. आणि त्यानंतर त्यांना जंगलात सोडून देण्यात आले आहे. काही गावकऱ्यांनी तर या सापांची अंडी आणि घरे देखील जंगलात पाहीली आहेत.

येथे सांप आता अधिवास करु लागले..

तज्ज्ञांच्या मते विषारी सांप केवळ डोंगराळ भागातच घुसलेले नाहीत. तर येथील वातावरणात सरमिसळून गेले आहेत. यास कारण वाढते तापमान म्हटले जात आहे. ग्लोबल वार्मिंगचा परिणाम आता नेपाळच्या पर्वतमय प्रदेशावर देखील होत आहे. येथील कमाल तापमान आता सपाट प्रदेशाच्या तुलनेत वेगाने वाढत आहे. जे 0.05 डिग्री सेल्सियस प्रति वर्ष आहे.याचमुळे पठारी प्रदेशात आढळणारे साप आता पर्वतात आढळू लागले आहेत.

ट्रक सोबत आले की आणले ?

हे साप शक्यतो लाकडे आणि भुशासोबत ट्रकद्वारे आले असावेत असे सापाचे रेस्क्यू ट्रेनर सुबोध आचार्य यांनी म्हटले आहे. परंतू ते
आता कायमस्वरुपी आता येथेच राहात आहेत. किंग कोब्रा आणि मोनोकल कोब्राला दक्षिणकाली, स्युचातार, गोकर्णा, गोदावरी आणि मकवानपुरच्या सिसनेरी परिसरातून या सापांना रेस्क्यू केलेले आहे.

सरकारची काय तयारी?

नेपाल सरकारने 2030 पर्यंत सापाच्या दंशाने होणारे मृत्यू 50% टक्क्यांपर्यंत कमी करण्यात लक्ष्य ठेवले आहे. याअंतर्गत पर्वत परिसरात उपचार केंद्र देखील उघडण्यात आली आहेत. भारतातून क्वाड्रिवेलेंट एंटी-वेनम आयात केले जाते.ज्यापासून सर्पदंशावर लस तयार केली जाते. परंतू पिट वायपर सारख्या स्थानिक सर्प दंशांवर अजूनही खात्रीलायक उपचार नाहीत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)