उन्हाळ्यात किडनीचे आरोग्य हेल्दी राहण्यासाठी असा घ्या आहार, तज्ञांकडुन जाणून घ्या

किडनीचे आरोग्य सांभाळाImage Credit source: गुगल

आजकालच्या वाईट खाण्याच्या सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे आपल्यापैकी अनेकांना आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या सतावत असतात. ज्यामध्ये किडनीशी संबंधित आजारांचाही समावेश आहे. किडनी हे शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे, जे शरीरात साचलेले टाकाऊ पदार्थ फिल्टर करून यूरिनद्वारे बाहेर काढुन टाकते. किडनी शरीरातील पाणी आणि सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम सारख्या खनिजांचे प्रमाण नियंत्रित करते. तसेच शरीरात व्हिटॅमिन डीचे सक्रिय स्वरूपात रूपांतर करतात, ज्याने हाडे निरोगी राखण्यास मदत होते. याशिवाय आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी किडनीचे इतरही अनेक कार्ये आहेत.

बदलत्या जीवलशैलीमुळे लोकांच्या खाण्याच्या सवयी खूप बदल्या आहेत. लोकांना जंकफुड आणि प्रक्रिया केलेले अन्न खायला आवडते. पण चवीच्या हव्यासापोटी अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचू शकते. अशा परिस्थितीत काही गोष्टी किडनीच्या आरोग्यास नुकसान पोहोचवतात. अशा परिस्थितीत किडनी निरोगी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ सेवन करणे योग्य आहेत आणि कोणते पदार्थ टाळावेत हे तज्ञांकडून जाणून घेऊया.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काय खावे?

दिल्लीतील श्री बालाजी अ‍ॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटमधील नेफ्रोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांटचे संचालक डॉ. राजेश अग्रवाल सांगतात की, किडनी निरोगी ठेवण्यासाठी आहारात काही आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम, तुम्ही तुमच्या आहारात पालक, ब्रोकोली, सफरचंद, डाळिंब, संत्री इत्यादी हिरव्या भाज्या आणि ताजी फळे समाविष्ट करावीत. या गोष्टी केवळ किडनी निरोगी ठेवण्यास मदत करत नाहीत तर शरीराला आवश्यक पोषण देखील देतात. याशिवाय, दररोज पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे, म्हणजेच 8 ते 10 ग्लास पाणी पिणे, कारण पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि किडनीवरील दबाव कमी करते.

त्याचबरोबर प्रथिनेयुक्त आहार किडनीसाठी देखील फायदेशीर आहे. परंतु या आहाराचे सेवन तुम्ही तुमच्या शरीराच्या गरजेनुसार संतुलित प्रमाणात घ्यावा. तुम्ही तुमच्या आहारात उकडलेले अंडे, डाळी, चीज, सोया, मासे इत्यादींचा समावेश करू शकता, जेणेकरून शरीराला पुरेसे प्रथिने मिळतील. याशिवाय, कोमट पाणी, लिंबू पाणी आणि ग्रीन टी सारखे डिटॉक्स ड्रिंक्स सेवन केल्याने किडनी स्वच्छ राहते आणि विषारी पदार्थ सहजपणे काढून टाकण्यास मदत होते.

कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

किडनी निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी पूर्णपणे टाळणे खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम तुम्ही जंक फूड आणि प्रक्रिया केलेले अन्न पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे, कारण त्यात सोडियम आणि इतर हानिकारक घटक असतात, जे किडनीवर जास्त दबाव आणतात. याशिवाय, जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे देखील टाळावे, कारण यामुळे तुमच्या शरीरातील रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे किडनीवर यांचे वाईट परिणाम होऊ शकते. मद्यपान आणि सिगारेटचे सेवन किडनीसाठी सर्वात हानिकारक आहे, म्हणून ते पूर्णपणे सोडून देणे चांगले.

पेनकिलर सारख्या कोणत्याही प्रकारची औषधे जास्त प्रमाणात घेणे टाळा, कारण त्याचा थेट तुमच्या किडनीवर परिणाम होतो. याशिवाय, जर तुम्हाला वारंवार लघवी करण्याची इच्छा होत असेल तर ती रोखू नका कारण असे केल्याने किडनीवर दबाव वाढतो आणि याच कारणांमुळे किडनीचे आरोग्य हळूहळू कमकुवत होऊ शकते. या गोष्टी टाळून तुम्ही तुमचे किडनी निरोगी ठेवू शकता.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी, तळलेले आणि मसालेदार पदार्थ टाळा. बरेच लोकं जेवणात मीठाचे प्रमाण जास्त वापरतात परंतु याचा त्यांच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून, मसाले आणि मीठ मर्यादित प्रमाणात खा. पोषक तत्वांनी समृद्ध संतुलित आहार घ्या आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करत रहा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)