Pune Water Crisis : पुणेकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. वाढत्या उन्हात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. त्यानंतर रोटेशन पद्धतीने एक दिवस पाणी कपातीचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. आता ५ मे पासून पुण्यात एक दिवस रोटेशन पद्धतीने पाणी कपात होणार आहे. पुणे महापालिकेने पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.
पाणीसाठा असताना कपात का?
खडकवासला धरणात जुलैपर्यंत पुरेल इतर पाणीसाठा असल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे. त्यानंतरही एक दिवस पाणी कपात का केली जात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जुलैपर्यंत पुरेल असे पाण्याचे नियोजन करण्यात येते. त्यामुळे पाणी कपातीचा कठोर निर्णय पुणे मनपाने घेतला आहे. निर्णयाची अंमलबजावणी सोमवार ५ मे पासून रोटेशन पद्धतीने करण्यात येणार आहे. पुण्यातील खडकवासला धरणात ४५ टक्के पाणी साठा आहे. तसेच पानशेत धरणही २८ टक्के भरले आहे.
कधी कोणत्या भागांत पाणी पुरवठा बंद
सोमवार
- बालाजीनगर : बालाजीनगर, श्रीहरी सोसयाटी, गुरूदत्त सोसायटी, साईकृपा सोसायटी, सर्वे नं २३, गुलमोहर सोसायटी, पवार हॉस्पीटल परिसर
- कात्रज : उत्कर्ष सोसायटी परिसर, गुजर वस्ती, कात्रज तलावा लगतचा पूर्व भाग, चौधरी गोठा
- कोंढवा : साईनगर, गजानन महाराज नगर, शांतीनगर सोसायटी, महानंदा सोसायटी, सावंत कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी.
मंगळवार
- सनसिटी : सनसिटी संपूर्ण, माणिकबाग, सनसिटी परिसर, समर्थ नगर, महालक्ष्मी सोसायटी, मधुकर हॉस्पीटल परिसर, विठ्ठलवाडी, विठठलनगर
- जुनी धायरी : संपूर्ण जुनी धायरी, उज्वल टेरेस, बारंगणी मळा, दळवीवाडी, पारी कंपनी रस्ता
- कात्रज : राजस सोसायटी परिसर, निरंजन सोसायटी, कमला सिटी, स्टेट बँक सोसायटी, नवीन पोस्ट ऑफिसचा भाग
- कोंढवा : कामठे पाटील नगर, खडीमशिन चौक, सिंहगड कॉलेज, हब टाऊन सोसायटी, कोलते पाटील सोसायटी, प्रभाग ३७
बुधवार
- वडगाव हिंगणे : वडगाव बुद्रूक, वडगाव हिंगणे, पेरूची बाग, धावडी, जाधवनगर, वडगाव गावठाण, जाधवनगर, खोरड वस्ती, सुदत्त संकूल, समर्थ नगर, संतोष मागील परिसर, हिंगणे, महादेवनगर, आंनद विहार, राजीव गांधी वसाहत
- कात्रज : वघजाईनगर, भांडेआळी, सुखदा-वरदा सोसायटी, सम्राट टॉवर, आंबामाता मंदीर पाठीमागील परिसर. शिवशंभोनगर गल्ली १ , माऊलीनगर, सिल्वहर ओक सोसायटी, बलकवडे नगर
- कोंढवा : सुखसागर नगर २, शिवशंभोनगर ( कात्रज- कोंढवा रस्ता) स्वामी समर्थ नगर
गुरुवार
- धनकवडी : सर्वे नं. २,३ धनकवडी गावठाण, बाळकृष्ण सोसायटी, सौदागर सोसायटी, राजमुद्रा सोसायटी, चित्तविहारी सोसायटी, अक्षयनगर, दौलतनगर, कलानगर, गुलाबनगर, चैतन्यनगर, सर्वे. नं. ३४,३५,३६,३७सह्याद्रीनगर, आदर्शनगर, प्रतिभानगर तळजाई पठार सर्व्हे नं.४,५,७,८, गणेशदत्त सोसायटी,
- टिळकनगर, सावरकर सोसायटी, आंबेडकर वसाहत, ग्रीन पार्क, अविष्कार सोसायटी, सन्मित्र सोसायटी, सागर सोसायटी, सहकारनगर भाग १, दाते बसस्टॉप
- कात्रज : सुखसागरनगर भाग १, मॅजेस्टीक टॉवर, रोहितदास महाराज मठ, शिवशंभोनगर, स्वामी समर्थनगर (डोंगर भाग) निलया सोसायटी, महादेवनगर भाग – २.
- कोंढवा : सावकाशनगर, काकडे वस्ती, शिवशंभोनगर (काकडे वस्तीचा भाग) गोकुळनगर (रस्त्याचा व डोंगर भाग), वृंदावननगर.
शुक्रवार
- आंबेगाव पठार : आंबेगाव पठार सर्वे नं. १५ ते सर्वे नं. ३०, महाराणा प्रताप चौक, सर्वे नं. १७ ते दत्तनगर भुयारी मार्ग, चंद्रभागानगर, त्रिमूर्ती चौक, भारती विहार सोसायटी, भारती विद्यापीठ मागील संपूर्ण परिसर
- कात्रज : वसवडेनगर, पोलीस कॉलनी, जाधवनगर, जोगेश्वरीनगर, मोरे-निंबाळकर वस्ती, भारतनगर,
- दत्तनगर.आगम मंदिर संतोषनगर अन्जलीनगर, दत्तनगर , जांभूळवाडी रस्ता, दत्तनगर, वंडर सिटी परिसर, साईनगर
- कोंढवा: कोंढवा बु. (गावठाण), वटेश्वर मंदिर, भोलेनाथ फर्निचर, हिल व्यू सोसायटी, मरळ नगर, कांतिन अपार्टमेंट, विष्णू ठोसरनगर, कोंढवा बु. (भाऊ कामठे गल्ली) कपिलनगर, लक्ष्मीनगर संपूर्ण.आचल फार्म
शनिवार
- कात्रज : , कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, अखील नवीन वसाहत कात्रज
- कोंढवा : राजीवगांधी वसाहत संर्पूण, चैत्रबन वसाहत, कुष्णनगर, झांबरे वस्ती, ग्रीन पार्क, अजमेरा पार्क, काकडेवस्ती गल्ली क्रमांक १ शिवशक्ती नगर, अशरफ नगर गल्ली क्रमांक ७,८ आणि ११
रविवार
- कात्रज : महादेवनगर भाग १ , आनंद नगर, विद्या नगर, महावीर नगर
- कोंढवा : शिवप्लाझा पिसोळी रस्ता, एच अॅड एम सोसायटी, पारगे नगर, १५ नंबर, आंबेडकर नगर संपूर्ण, पुण्यधाम आश्रम रस्ता,हगवणे नगर, अशरफ नगर पूर्ण