सिल्की आणि स्टाईलिंग केसांसाठी सीरम लावताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, तरच मिळेल पूर्ण फायदा

प्रत्येकाला आपले केस मजबूत आणि चांगले राहण्यासाठी अनेक उपाय करत असतात. तसेच केस मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी पहिले सगळेजण ऑईल मसाज करायचे. त्याचबरोबर अनेकजण हेअर वॉशसाठी मुलतानी माती, आवळा शिकाकाई आणि रिठा यासारख्या वस्तूंचाही वापर करत असतात. मात्र काळाच्या ओघात केसांच्या समस्या वाढत असल्याने अनेक कंपन्यांनी हेअर केअर ची असंख्य उत्पादने बाजारात आणली आहेत. यासाठी सिल्की आणि स्टाईलिंग केसांसाठी बहुतेकजण सीरमही वापरतात. खरं तर सीरम हे एक उत्पादन आहे जे सिलिकॉन-आधारित द्रव आहे. हे केसांच्या मुळापर्यंत जात नाही, तर केसांच्या वरच्या थरावर लेप लावले जाते.

सीरम केसांचा पोत बदलत नाही, परंतु धूळ आणि इतर हानिकारक विषारी पदार्थांपासून केसांचे संरक्षण करण्यास उपयुक्त आहे. यामुळे केस गळणे, केस तुटणे, स्प्लिट टोक, फिकट केस यासारख्या समस्या कमी होतात. मात्र सीरम वापरताना काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

केसांच्या प्रकारानुसार सीरम निवडा

सीरम खरेदी करण्यापूर्वी तुमच्या केसांचा प्रकार कोणता आहे हे जाणून घ्या. हलके सीरम तुमच्यासाठी योग्य असेल किंवा तुम्ही अधिक आर्द्रता देणारे सीरम वापरावे. अशा प्रकारे तुम्ही योग्य सीरम निवडू शकाल आणि तुम्हाला पूर्ण फायदा मिळेल.

ओलसर केसांवरच सीरम लावा

सीरम लावण्याचा उत्तम मार्ग म्हणजे ओल्या केसांवर लावणे. पण तुम्ही हे लक्षात ठेवा की केस धुतल्यानंतर लगेच सीरम लावू नये. सर्वप्रथम टॉवेलने केस पुसून घ्या आणि केसांमधील ओलावा नॉर्मल झाल्यावर म्हणजेच केस साधारण ८० टक्के कोरडे असतील तेव्हा सीरम लावा. यामुळे तुमचे केस ही फ्रिजी होणार नाहीत.

सीरम योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे

केस सिल्की करण्यासाठी जर तुम्ही तुमच्या केसांना सीरम लावत असाल तर केसांनुसार सीरम योग्य प्रमाणात लावा. जर तुमचे केस पातळ असतील तर कमी सीरम लावा आणि लांब आणि दाट केस असतील तर त्यानुसार सीरमचे प्रमाण घ्या. जास्त किंवा खूप कमी सीरम लावल्यास तुम्हाला हवेत तसे केस सिल्की होणार नाही. याशिवाय केसांच्या मुळापर्यंत सीरम लावू नये.

या लोकांनी काळजी घ्यावी

सीरम लावण्यापूर्वी लक्षात ठेवा की तुमची त्वचा सेंसेटिव्ह नाहीये. याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची त्वचेची ॲलर्जी असेल तर सीरम लावण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, अन्यथा समस्या वाढू शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)