Kalyan Marathi Man : कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण, पोलिसांची भूमिका काय? योगीधामवरील घटनाक्रमावर डॅशिंग पोलीस अधिकारी अतुल झेंडे म्हणाले काय?

कल्याण शहरातील योगीधाममध्ये मराठी कुटुंबाला शेजारी आणि गावगुंडांनी रॉडने बेदम मारहाण केली. मराठी भाषेवरून त्यांच्यावर शेरेबाजी सुद्धा करण्यात आली. त्यानंतर वातावरण तापले. विरोधकांसह मनसेने हे प्रकरण उचलून धरले. विधानसभेत या मुद्दावरून गदारोळ झाला. या सर्व प्रकरणात अखिलेश शुक्ला याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला. तर आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणावर बाजू मांडली. काय चौकशी करण्यात येणार, काय कारवाई करणार याची माहिती दिली. कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी तपासाची दिशा सांगितली.

परस्पर गुन्हे दाखल

या घटनेविषयी कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी माहिती दिली. त्यानुसार, 18 डिसेंबर रोजी योगीधाम परिसराची घटना घडली. दोन परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गंभीर दुखापत करणे विनयभंग असे दोन गुन्हे दाखल केले आहेत. गंभीर दुखापत करणे या आरोपांमध्ये दोन आरोपींना आपण अटक केलेले आहे इतर आरोपीच्या शोधात आहोत त्यांनाही लवकर अटक करू, अशी माहिती त्यांनी दिली.

प्राथमिक माहितीनुसार दोन्ही परस्पर विरोधी गट पोलीस तालुक्यात तक्रार देण्यासाठी आले होते. फिर्याद नोंदवण्याचा काम पोलीस स्टेशनला चालू होतं. त्या अनुषंगाने कोणाला सोडण्यात आलं, अटक करण्यात आली नाही याची चौकशी करणार आहे. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही पाहत कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दिरंगाई केल्यास पोलीसांवर कारवाई

मराठी भाषा शिवीगाळ केल्याप्रकरणात कारवाईचे आश्वासन त्यांनी दिले. मराठी भाषेवर टीक केल्याप्रकरणी काही व्हिडिओ प्राप्त झालेले आहेत. मराठी अस्मितेचा मुद्दा आहे आणि मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचे पोलिसांची आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांवरती दिरंगाई केल्याचा आरोप आहे याबाबत आमचे एसीपी कल्याण घेटे हे चौकशी करणार आहेत. पोलिसांची दिरंगाई असल्यास त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पोलीस अधिकार्‍यांवरती आणि आमच्या वरती कोणाचा दबाव नाही मात्र त्या दिवशी काय घडलं त्याची संपूर्ण चौकशी करण्यासाठी एसीपीची नेमणूक केलेली आहे ते चौकशी केली करतील व त्यांचा रिपोर्ट आमच्याकडे सादर करतील त्यानंतर जे निष्पन्न होईल त्यावर कायदेशीर कारवाई करणार, असे त्यांनी स्पष्ट केले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)