मोठी बातमी समोर येत आहे, आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. रोहित पवार आणि रोहित पाटील यांना पक्षामध्ये मोठी जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी देखील काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर काही पदाधिकाऱ्यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बदली करावी अशी देखील मागणी केली आहे.
शरद पवारांसमोरच कोंडी
या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित होते. या बैठकीमध्ये पक्षातील प्रमुख पदांमध्ये बदल करण्यात यावेत अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तसेच जंयत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून बदली करावी अशी मागणी देखील काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. शरद पवार यांच्यासमोरच पादाधिकाऱ्यांनी अशी मागणी केल्यामुळे जयंत पाटील यांची शरद पवार यांच्यासमोरच कोंडी झाली.
दरम्यान यावर आता जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजुला होतो. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. बोलणं सोप्प असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं. बूथवर काय काम केलं याचा डेटा द्या. सभागृहामध्ये सध्या जेवढे लोक बसले आहेत, त्यांनी निवडणुकीत काय काम केलं त्याचा डेटा पक्ष कार्यालयात जमा करावा, त्यानंतर आठ दिवसांमध्ये पद सोडण्यावर निर्णय घेतो असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार आणि रोहित पाटलांकडे महत्त्वाची जबाबदारी देण्याची मागणी
दरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी अशी देखील मागणी काही पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता शरद पवार भाकरी फिरवणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.