जयंत पाटील इतके दिवस तिकडे थांबले हेच खूप आहे. त्यांनी आधीच अजित पवारांसोबत यायला हवं होत. पण आता अजितदादांकडे येण्याची त्यांची वेळ झालेली आहे. जयंत पाटील हे महाराष्ट्राचे महत्वाचे नेते आहेत. राष्ट्रवादीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. जयंत पाटील एक चांगला माणूस आहे. हा चांगला माणूस आमच्यासोबत आला तर राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असंही दीपक मानकर म्हणाले.
जयंत पाटील यांनी या लोकसभा निवडणुकीत सेनापतीची भूमिका पार पाडली आहे. सेनापतीला त्यांचा मान मिळायला हवा, जयंत पाटलांना त्यांच्या सन्मानापासून जर रोहित पवार बाजूला ठेवत असतील तर हे योग्य नाही. आमची मागणी आहे की जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबत यावं, दादा त्यांचा सन्मान करतील, असं ते म्हणाले.
रोहित पवार प्रदेशाध्यक्ष होतील असं वाटत नाही पण राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. जयंत पाटील यांना दुटप्पी वागणूक मिळत असताना आणि त्यांचा अपमान होत असताना मनाला वेदना होतात. जयंत पाटील हे सुज्ञ नेते आहेत. राजकारण त्यांनी कोळून पिलेले आहे, जयंत पाटील लवकरात लवकर अजित पवारांच्या प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत वाद मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि त्याचा लवकर स्फोट होईल, असा दावाही त्यांनी केला.