जयकुमार गोरे कलाकार, त्यांना कचका…मनोज जरांगेंचा मोठा इशारा

मनोज जरांगेंचा मोठा इशाराImage Credit source: टीव्ही ९ मराठी

महायुतीमधील एक एक करत काही मंत्री महाविकास आघाडीच्या रडारवर येत आहेत. दोन दिवसांपासून धनंजय मुंडे आणि माणिकराव कोटे हे विरोधकांच्या अजेंड्यावर होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील धक्कादायक फोटो बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली विकेट पडली. तर आज न्यायालयाच्या निकालानंतर माणिकराव कोकाटे यांचे भवितव्य ठरेल. दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मोर्चा वळवला. त्यांनी महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा इशारा दिला.

जरांगे पाटील यांचा संताप

चलती असताना नीच वागू नये, आमच्याकडे ते लोक येणार आहेत, नंतर त्याला कचका दाखवतो, त्याने महिलेला विवस्त्र फोटो पाठवले, माझ्याकडे त्या महिला येणार आहेत. हाच तो मंत्री आहे, आपल्या सभेला विरोध केलेला माणूस आहे. कधी ना कधी दिवस बदलतात. जयकुमार गोरेंना फडणवीसांनी बडतर्फ करून गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

कराडला केले हे आवाहन

धनंजय मुंडेंना आमदारकी पासून दूर ठेवावं, अशी मागणी त्यांनी केली. धनंजय मुंडे मंत्री असताना आरोपी कराड मुंडेंचे व्यवहार बघत होता. मुंडेंचे कामं वाल्मिक कराड करून देत होता का? खून झाल्यानंतर आरोपींनी धनंजय मुंडेंना संपर्क केला होता का? धनंजय मुंडेच मुख्य कार्यालय आरोपी नंबर 1 पाहायचा. खून प्रकरणात 302 मध्ये धनंजय मुंडे पण येतात. आता केवळ चौकशी बाकी आहे.

खून झाल्यानंतर मुंडेंना फोन पण गेले आहेत, फरार आरोपीला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेंनी मदत केली का? खून होण्या अगोदर, ते राजीनामा देण्यापर्यंतचा धनंजय मुंडेंचा सीडीआर काढा. धनंजय मुंडेंनी प्रकरणात मदत करण्यासाठी वैयक्तिक माणसं पाठवली 302 मध्ये धनंजय मुंडेंना अटक केलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली.

तर कराड याने एकट्याने मरु नये त्याने मुंडे यांचे नाव घ्यावे, असे मी त्याच्या कुटुंबाला सांगतो, एक नंबर आरोपी बोलला नाही तर त्याला फाशी होणार, हे कुटुंबाने जाणून घेतले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

कुणबी आणि मराठा एकच

मराठा आरक्षण विषय निकाली काढा, मुख्यमंत्री आणि सर्व विधानसभा सदस्यांना विनंती आहे, कुणबी आणि मराठा एक आहे. सर्व पक्षातील आमदारांना विनंती आहे, अधिवेशनात मराठा समाजाच्या प्रश्न लावून धरावे. हैदराबाद गॅझेट या अधिवेशनात लागू करा. सोबत बॉम्बे, सातारा, औंध गॅझेट लागू करा, अशी मागणी त्यांनी केली.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)