उन्हाने जीवाची होतीया काहीली, पण या 5 लोकांनी ऊसाचा रस अजिबात पिऊ नये..का ते वाचा

Loss of sugarcane juice : मार्च संपत असला तरी उन्हाचा तडाखा आता वाढत जाणार आहे. अनेक जण ऊन्हाळ्यात ऊसाचा रस पिऊन जीव शांत करीत असतात. ऊसाच्या रसात कॅल्शियम, तांबे, मॅग्नीशियम, मँगनीज, झिंक, आयर्न आणि पोटॅशियम अशी तत्वं आहेत. ऊसाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. ऊसाचा रस जेव्हा काढला जातो. तेव्हा त्यात १५ टक्के कच्ची साखर असते. ती फळांच्या स्मूदीहून कमी असते. जरी ऊसाचा रस आरोग्यासाठी चांगला असला तरी काही लोकांसाठी ऊसाचा रस धोकादायक देखील असू शकतो. त्यामुळे ऊसाचा रस कोणी पिऊ नये याची माहीती वाचूया….

तज्ज्ञाच्या मते ऊसाचा रसात पॉलीकोसॅनॉल नावाचे तत्व आढळते. हे रक्ताला पातळ करण्यात मदत करते. रक्तात गुठल्या तयार होऊ देत नाही.यामुळे हृदयविकार असणाऱ्यांसाठी ऊसाचा रस चांगला आहे. मात्र, जखम झाली तर ऊसाचा रस प्यायल्याने जास्त रक्तस्राव होऊ शकतो.

कोणी ऊसाचा रस पिऊ नये

डायबिटीज: २४० एमएल ऊसाच्या रसात ५० ग्रॅम साखर असते. ती १२ चमच्यांबरोबर असते. पण ऊसाच्या रसात ग्लायसेमिक इंडेक्स (जीआय ) कमी असते. तर ग्लायसेमिक लोड ( जीएल ) जास्त असते. त्यामुळे ऊसाचा रस ब्लड शुगरला वाढवतो. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांनी चुकूनही ऊसाच्या रसाच्या वाट्याला जाऊ नये.

सर्दी-पडसे:

डोकेदुखी, सर्दी आणि पडसे सारख्या त्रासात ऊसाचा रस अजिबात घेऊ नये, त्यामुळे तब्येत आणखीनच खराब होऊ शकते. ऊसाच्या रसाचा गुणधर्म थंड आहे. त्यामुळे पोलीकोसॅनॉल तुम्हाला डोकेदुखी होऊ शकते.

अनिद्रा:

डॉक्टराच्या मते ज्यांनी अनिद्रेचा त्रास आहे त्यांनी ऊसाचा रस घेऊ नये, ऊसाच्या रसात आढळणारे पोलीकोसॅनॉल तुम्हाला अनिद्रा देऊ शकते. तुम्हाला आधीपासून ताणतणाव आणि अनिद्रेची समस्या असेल तर ऊसाचा रस अजिबात घेऊ नका…

कोलेस्ट्रॉल:

जर तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर ऊसाच्या सेवनापासून दूर राहीले पाहीजे. कारण गुड कोलेस्ट्रॉलला बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये कन्व्हर्ट करते. त्यामुळे ऊसाचा रस प्यायल्याने बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)