Israeli Tourist Rape : भयानक, भारतात इस्रायली महिलेवर बलात्कार, तिघांना कालव्यात फेकलं, एक मुलगा महाराष्ट्रातला

कर्नाटकच्या हम्पीमध्ये एका हादरवून सोडणारी घटना घडली आहे. काही अज्ज्ञात आरोपींनी इस्रायली पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला. त्यांच्यासोबत आलेल्या तीन जणांना मारहाण केली. व तिथून वाहणाऱ्या तुंगभद्रा कालव्यात फेकून दिलं. एकाचा मृतदेह शनिवारी सकाळी मिळाला. पोलिसांनी तीन अज्ज्ञात आरोपींविरोधात बलात्कार दरोड, हल्ला आणि हत्येचा प्रयत्न या कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरु केलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलांपैकी एक इस्रायली पर्यटक आणि दुसरी होमस्टे संचालिका आहे.

ही घटना गुरुवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. सनापूर कालव्याजवळ हल्लेखोरांनी हे कृत्य केलं. किनाऱ्यावर सगळे गाणी ऐकत होते. त्याचवेळी तिथे तीन बाइकस्वार आले. त्यांनी पेट्रोल पंपाबद्दल विचारणा केली. इथे आसपास कुठलाही पेट्रोल पंप नाही असं सांगितलं. त्यानंतर आरोपींनी पर्यटकांकडे 100 रुपयाची मागणी केली.

तीन मुलांना कालव्यात फेकलं

पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ सुरु केली. दोन महिलांवर बलात्कार केला. सोबत असलेल्या तिघांनी विरोध केल्यानंतर तीन मुलांना त्यांनी तिथून वाहणाऱ्या कालव्यात फेकून दिलं. दोघे जखमी असून एक पर्यटक बेपत्ता आहे. जो बेपत्ता आहे, त्याच नाव बिबाश असून तो ओदिशाचा आहे.

रक्कम लुटून पसार

जे पाचजण तिथे होते त्यातला एक जण महाराष्ट्रातला आहे. डेनियल पिटास (23) हा अमेरिकन नागिरक आहे. पंकज पाटील (42) हा महाराष्ट्रातला आहे. तक्रारदारांनी ही माहिती दिली. डेनियल आणि पंकज यांना पोहता येत असल्याने त्यांनी किनारा गाठला. दोन महिलांवर बलात्कार केला व त्याच्याजवळ असलेली 9500 रुपयांची रक्कम लुटून पसार झाले. पोलीस आरोपींची ओळख पटवून लवकरात लवकर त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पीडित महिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवणार का?

रात्रीच जेवण झाल्यानंतर हे किनाऱ्यावर गाणी ऐकत बसले होते. पीडित महिलांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण त्यांची इच्छा असेल, तर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केलं जाऊ शकतं, असं पोलिसांनी सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)