पश्चिम महाराष्ट्र आणि इतर भागाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. येथील पुणे – सोलापूर महामार्गावर पाटस येथे ढगफूटी सदृश्य पाऊस पडल्याने रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पुणे- सातारा महामार्गावर माती खचून क्रॅक पडल्याची घटना घडल्याने वाहनचालकांच्या समोर संकट उभे राहिले होते. त्यामुळे घाटातून कार चालवणे रिस्की झाले असतानाच पुणे – सोलापूर महामार्गावर पावसाच्या माऱ्याने पाणी तुंबून त्यात इनोव्हा कार वाहून गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोकणात आणि आजूबाजूच्या प्रातांत येत्या दोन दिवसात मान्सून सक्रीय होऊन जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा वेध शाळेने दिला आहे. रायगड जिल्ह्याला तर मोठा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशात आठवड्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाने पुणे- सोलापूर महामार्गावर पाटस येथे अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळ्याने पाण्याचा पुर येऊन त्यात एक इनोव्हा कार वाहून गेल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायलर होत आहे. इनोव्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल झाला आहे.
येथे पोस्ट पाहा –
सोलापूर पुणे महामार्गावर प्रवाशांचे प्रचंड हाल…@AjitPawarSpeaks @CollectorPune @puneruralpolice pic.twitter.com/Hpi4gTGKMo
— SurajK (@surajkhodse) May 25, 2025
पावसाच्या माऱ्याने प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा एक व्हिडीओ एका प्रवाशाने सोशल मीडियावर टाकला आहे.या व्हिडीओत संपूर्ण महामार्ग पाण्यात बुडाल्याचे दृश्य दिसत आहे. व्हिडिओत काही प्रवासी रस्त्याच्या दुभाजकावर अडकलेले दिसत आहेत तर काहीजण त्यांच्या वाहनांमध्ये पूरग्रस्त भागातून वाहन तसेच चालवून प्रवास करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
येथे व्हिडीओ पाहा –
सोलापूर पुणे रस्त्यावर पाटस येथे ढगफुटी.. pic.twitter.com/u7jtQNvZB5
— पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@PuneriSpeaks) May 25, 2025
पुणे, सातारा आणि आसपासच्या भागात आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसाने काय हाल झाले याचे हाल या व्हिडिओत दिसत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांना या मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. विषेश म्हणजे, या आठवड्याच्या सुरुवातीलाच जोरदार पावसाने पुणे-सातारा महामार्गालाही भेगा पडल्याची घटना घडली होता. यंदा मान्सून केरळात मान्सून एक आठवड्या आधीच दाखल झाला आहे. मुंबईतही सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे अशा बेभरवसी पावसाने येणाऱ्या पावसाळ्यात रस्ते आणि वाहन सुरक्षा याविषयी चिंता व्यक्त होत आहे.