भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचा मोठा निर्णय

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली. आता या पार्श्वभूमीवर भारतात सतर्कता बाळगली जात आहे. त्यातच आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराने मोठा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात भाविकांना रविवारपासून हार आणि नारळ अर्पण करता येणार नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)