महाशिवरात्री हिंदूंसाठी पवित्र असलेला धार्मिक सण केवळ भारतातच नाही तर नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या सारख्या देशातही मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. या ठीकाणी मंदिरात भगवान भोलेनाथ शंकराच्या पिंडीची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. भारतातून देखील भक्त येथे दर्शनासाठी दाखल होत असतात. परंतू पाकिस्तानातील अनेक मंदिराची स्थिती आता अनेक दशकांनंतर कमजोर झाली असली तरी त्याचे धार्मिक महतवे कमी झालेले आहे.
महाशिवरात्रीचा सण हा केवळ हा भारतातच नाही तर जगातील अनेक देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शिवभक्त या विशेष दिनी मंदिरात मोठ्या संख्येने पूजा करीत असतात. या हा दिवस त्यांच्या साठी खूप महत्वाचा असतो. या दिवसासाठी जगभरातून मंदिरात भगवान शिवाची प्रार्थना करीत असतात.
वरुण देव मंदिर
पाकिस्तानच्या कराची पासून काही अंतरावर ऐतिहासिक शिव मंदिर आहे.याला ‘मनोरा शिव मंदिर’ आणि ‘वरुण देव मंदिरच्या नावाने देखील ओळखले जाते. या मंदिराची निर्मिती प्राचीन काळात झाली आहे. हे श्रद्धाळूंसाठी एक महत्वाचे तिर्थ स्थळ आहे. हे मंदिर समुद्र देवता वरुण आणि भगवान शिवाच्या पूजेसाठी ओळखले जाते. महाशिवरात्रीला येथे विशेष पुजा आणि अभिषेक केला जातो. येथे पाकिस्तानातील अनेक भागातून श्रद्धाळू या ठिकाणी दाखल होतात. आता या मंदिराची स्थिती जर्जर झाली आहे. परंतू या मंदिराचे धार्मिक महत्व कमी झालेले नाही.
कटासराज मंदिर
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असलेले कटासराज मंदिर शिव भक्तांसाठी अत्यंत पवित्र स्थळ आहे. असे म्हटले जाते की जेव्हा माता सतीचे निधन झाले तेव्हा भगवान शिवशंकराचा अश्रू जेथे पडले तेथे या मंदिराची निर्मिती केली आहे. हे मंदिर एका विशाल परिसरात पसरले असून यात अनेक छोटे – मोठे मंदिरे उभी आहेत. महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्यने हिंदू श्रद्धाळू येते येतात आणि शिवलिंगावर जलाभिषेक करीत असतात. पाकिस्तान सरकारने देखील या मंदिर परिसराचा धार्मिक पर्यटन स्थलाच्या रुपात विकास करण्याच्या प्रयत्न करीत आहे.
गौरी मंदिर
पाकिस्तानातील सिंधप्रांतात असलेल्या गौरी मंदिर भगवान शिव आणि देवी पार्वतीला समर्पित आहे. या मंदिराच्या निर्मिती ३०० वर्षांपूर्वी झाली होती. या मंदिराची वास्तूकला राजस्थानी शैलीची असून ते मंदिराचे खास आकर्षणाचा भाग आहे. महाशिवरात्रीच्या दरम्यान विशेष रुपाने पूजा केली जाते. भजन आणि किर्तनाचे आयोजन केले होते. पाकिस्तानात राहाणाऱ्या हिंदू भाविकांसाठी हे मंदिर पवित्र स्थान म्हटले जाते.
पशुपतीनाथ मंदिर
नेपाळची राजधानी काठमांडू येथील प्रख्यात पशुपतीनाथ मंदिरात भगवान शंकराच्या १२ ज्योतीर्लिंगांपैकी एक मानले जाते. हे मंदिर दक्षिण आशियातील सर्वात पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे. दर वर्षी येथे महाशिवरात्रीला येथे लाखो भाविक जमतात. नेपाळ सरकार महाशिवरात्रीच्या दिवसी भक्तांना नीट रांगेने दर्शन मिळावले यासाठी खास बंदोबस्त करीत या दिवशी मंदिरात अनेक विधी केले जातात. पशुपतीनाथ मंदिराला शिवभक्तांचा स्वर्ग देखील म्हटले जाते. हे मंदिर केवळ नेपाळच नाही तर भारत आणि अन्य देशातील भाविक येथे जमतात.
गोरखनाथ मंदिर
नेपाळची राजधानी काठमांडूतील गोरखनाथ मंदिर देखील शिवभक्तांसाठी महत्वाचे आहे. या मंदिरात भगवान शिव अवतार गोरखनाथ यांना समर्पित आहे. जे नाथ संप्रदायाचे प्रमुख संत होते. महाशिवरात्रीला येथे विशेष पूजा आणि भजन-किर्तनाचे आयोजन केले जाते.या मंदिराचे ऐतिहासिक महत्व खूप आहे, कारण नेपालचे राजा देखील या पूजेत सहभागी असतो.
त्रिंकोमाली कोनेश्वरम मंदिर
श्रीलंकेतील त्रिंकोमालीतील कोनेश्वरम मंदिर भगवान शंकराच्या प्रमुख मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर हिंद महासागराच्या किनारी एक डोंगरावर आहे. या मंदिराच्या सौदर्य खूप चांगले आहे. हे मंदिर हजारो वर्षे जुने आहे. हे मंदिर खूप पुरातन असून रामायण काळाशी याचा संबंध आहे. महाशिवरात्रीला येथे हजारो श्रद्धाळू येथे येतात. आणि भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते.
भगवान शिवाचे कोलंबोत मंदिर
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये श्री कैलावासनाथन स्वामी देवस्थानम कोविल भगवान शिवाला समर्पित एक भव्य मंदिर आहे. या मंदिरात महाशिवरात्रीला हिंदू श्रद्धाळूंची गर्दी होते.या महा शिवरात्रीला मंदिरात भव्य पूजेचे आयोजन केले जाते. रात्री संपूर्णपणे जागरण केले जाते.या मंदिरात तामिल हिंदू परंपरेनुसार पूजा केली जाते. या मंदिरात परदेशी नागरिक देखील येत असतात.