पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, आरोपींनी चक्क खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवला आहे. ऑर्डर पाहून न्यायाधिशांना देखील मोठा धक्का बसला. ही ऑर्डर मी दिलेलीच नाही असं न्यायाधिशांनी म्हटलं आहे. पुणे दिवाणी कोर्टात हा प्रकार घडला आहे. खोटे निकाल पत्र पाहून कोर्टही हादरलं आहे. दरम्यान याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात देखील याचिका सुरू आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
पुणे शहरात सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची 50 वर्ष जुनी कंपनी आहे. या कंपनीने वीज उपकेंद्रासाठी फायर फायटिंग सिस्टम तयार करीत तिचे पेटंट मिळवले. भारतात अशा प्रकारची यंत्रणा फक्त सीटीआर कंपनी देते. असे असताना चेन्नई येथील इसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने सी टी आर कंपनीचे पेटीएम चोरण्यासाठी अनेक ठिकाणी जाऊन यंत्राचे डिझाईन कॉपी केले. ही बाब सीटीआर कंपनीच्या व्यवस्थापनाला कळताच पुणे येथील विमान नगर पोलीस ठाण्यात चेन्नई येथील इसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे उच्चस्पद अधिकारी रविकुमार रामास्वामी, हरिभाऊ चिमटे यांच्यासह एकूण पाच जणांवर विमान नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपींना अटकही झाली.
याच प्रकरणात आरोपींनी चक्क खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवला आहे. ऑर्डर पाहून न्यायाधिशांना देखील मोठा धक्का बसला. ही ऑर्डर मी दिलेलीच नाही असं न्यायाधिशांनी म्हटलं आहे. मात्र या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुणे दिवाणी कोर्टात हा प्रकार घडला आहे.
मुंबई उच्च न्यायालयातही याचिका
दरम्यान सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडने चेन्नई येथील इसन एमआर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. मात्र याचदरम्यान आरोपींनी चक्क खोटी ऑर्डर सादर करत जामीन मिळवल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.