Black Magic in Pune : पुणे विद्याचे माहेरघर असलेले शहर म्हटले जाते. पुण्याला देशाची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. या पुण्यात काळू जादूसारखा अघोरी प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या नेत्याच्या घरासमोर हा प्रकार झाला. पुण्याचे माजी महापौर असलेले दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर काळी जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
पुण्यातील धनकवडी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे राहतात. त्यांच्या बंगल्यासमोर काळी जादू करण्याचा धक्कादायक प्रकार २९ मार्च रोजी करण्यात आला. नारळ, दहीभात, उकडलेले अंडी, लिंबू, काळा बुक्का असे काळ्या जादूचे साहित्य त्यांच्या घरासमोर आढळून आले आहे. अघोरी विधी करणाऱ्या महिलेचे नाव धानका काकासाहेब चव्हाण असे आहे.
चार महिन्यांपासून असा प्रकार
आरोपी धानका ही गेल्या चार महिन्यांपासून अमावस्येच्या दिवशी धनकवडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अघोरी विधी करत आहे. वेगवेगळ्या व्यक्तींच्या घरासमोर नारळ, दहीभात, उकडलेले अंडी, लिंबू, काळा अगीर हे काळ्या जादूचे साहित्य ठेवून अघोरी विधी करत असल्याची माहिती समोर येत होती.
२९ मार्च रोजी अमावस्येच्या दिवशी रात्री आठ वाजता धानका हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर दत्ता धनकवडे यांच्या बंगल्यासमोर हा प्रकार केला. नारळ भातुकलेल्या अंडी, लिंबू आदी आघोरी प्रकार ठेवून जादूटोणा करण्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका बडा नेत्याच्या घरासमोर जादू टोण्याचा धक्कादायक प्रकार केला. हे प्रकरण उघडकीस आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची माहिती स्थानिक लोकांना समजल्यावर त्या महिलेस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी पोलीस चौकशीतून काय माहिती समोर येते? त्या महिलेस हे कृत्य कोणी करायला लावले? या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता आहे.