नागपूर नावाचा इतिहासImage Credit source: गुगल
महाराष्ट्रातील अनेक शहरं ही देशाच्या नकाशावर ठळकपणे दिसतात. ती लोकप्रिय आहेत. नागपूर पण असेच एक लोकप्रिय शहर आहे. नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. हिवाळी अधिवेशन येथे भरते. हे देशातील मध्यवर्ती शहर म्हणून पण ओळखले जाते. हे शहर ऑरेंज सिटी म्हणून पण ओळखल्या जाते.- पण या शहराला नागपूर हे नाव कशामुळे पडले? खरंच सापांमुळे हे नाव पडलं का? काय आहे त्याचा इतिहास? जाणून घ्या…
18 व्या शतकात स्थापना
या शहराची स्थापना 18 व्या शतकात करण्यात आली होती. नागपूर हे एकदम हटके नाव आहे. या नावावरून अनेकांना वाटते अथवा काही जण गंमतीने इथं फार नाग, साप सापडायचे म्हणून या शहराचे नाव नागपूर असे पडले असे सांगतात. पण या नावामागे एक इतिहास आहे. तो अनेकांना माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे का, या शहराला नागपूर हे नाव का पडले ते?
नागपूरची संत्री संपूर्ण जगात लोकप्रिय आहेत. येथील रसरशीत आणि गोड संत्र्यांना परदेशात सुद्धा मोठी मागणी आहे. अनेक टन संत्री देशातच नाही तर परदेशात सुद्धा पाठवण्यात येतात. या शहराचा इतिहास जवळपास 3 हजार वर्षे जुना आहे. मग संत्र्यांसाठी लोकप्रिय असलेल्या या शहराला नागपूर हे नाव, ही ओळख कशी मिळाली?
यामुळे पडले नागपूर नाव
या शहराचे नाव नागपूर असल्याबाबत अनेक मत प्रवाह आहेत. येथे नागवंशीय लोकांची वस्ती असल्याने या गावाला नागपूर हे नाव पडले असे एक मत आहे. तर काही जण दुसरे मत मांडतात. नाग नदीच्या नावावरून या शहराला नागपूर असे नाव पडल्याचा दावा करण्यात येतो. नाग नदी नागपूरमधून वाहते.
नागपूरचे जुने नाव माहिती आहे का?
नागपूर हे नाव मिळणाऱ्या पूर्वी या गावाला दुसर्याच नावाने ओळखले जायचे. नागपूरचे जुने नाव फनिपूर अथवा फणिद्रपुरा असे होते. हे एक मराठी नाव आहे, त्याचा अर्थ फणादारी नाग अथवा साप. काही दाव्यानुसार, नागपूर शहर जिथे आहे, तिथे पूर्वी नागफणीचे जंगल होते. त्यावेळी तिथे नाग सुद्धा मोठ्या संख्येने होते. पण काही लोक हा संदर्भ नागवंशीय लोकांसाठी असल्याचा दावा करतात. आज नागपूर हे शिक्षण, व्यापार, राजकारणापासून इतर प्रांतात प्रगतीवर आहे.