जखम झाल्यास हे उपाय थांबवतील रक्तस्त्राव, डॉक्टरांकडे जाण्याची देखील पडणार नाही गरज

स्वयंपाक घरात काम करताना चाकूने कापले जाणे काच किंवा कोणतेही तीक्ष्णू वस्तू पायात अडकणे. यासारख्या घटना बहुतेक घरांमध्ये घडतात. त्याचबरोबर मुलं ही खोडकरपणा करत असतात आणि रोज कुठून ना कुठून जखमी होऊन येतात. प्रथमोपचाराच्या गोष्टी नेहमीच घरी उपलब्ध नसतात किंवा लगेच डॉक्टरांकडे घेऊन जाणे देखील शक्य नसते. त्यामुळे प्रथम घरी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी उपाय करणे महत्त्वाचे आहे. घरामध्ये अशा अनेक गोष्टी असतात ज्या जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबवण्यास प्रभावी ठरतात. काही दुखापत झाली असेल तर डॉक्टरांना दाखवणं गरजेचे आहे. परंतु जर छोटी जखम असेल तर रक्तस्त्राव ताबडतोब थांबवण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात आणि जास्त काळजी करण्याची गरज देखील नसते. जाणून घेऊ स्वयंपाक घरातील कोणत्या गोष्टींमुळे जखमेतून होणारा रक्तस्त्राव थांबू शकतो.

हळद

भारतातील प्रत्येक स्वयंपाक घरामध्ये हळद असतेच. जखम झाल्यावर त्यावर लगेच हळद पावडर लावल्यास रक्तस्त्राव थांबतो आणि अँटिसेप्टिक म्हणूनही हळद काम करते. मुका मार लागला असेल तर मोहरीच्या तेलात हळद शिजवून लागलेल्या ठिकाणी लावा आणि त्यावर पट्टी बांधा यामुळे कमी वेळात खूप आराम मिळतो. दुखापतीमुळे होणारे दुखणे आणि सूज यापासून आराम मिळवून देण्यासाठी हळदीचे दूध पिल्याने देखील आराम मिळतो.

बर्फ

काही कापले असेल किंवा छोटेशी दुखापत झाली असेल तर सर्वप्रथम त्या भागावर एक सुती कपडा किंवा कापूस ठेवा. ज्यामुळे रक्तस्त्राव वेगाने होणार नाही. यानंतर जखमेवर बर्फाचा तुकडा काही काळ ठेवा आणि हे काही वेळ तसेच करत रहा. दोन ते तीन मिनिटात रक्तस्त्राव थांबेल.

साखर

लहान मुले बऱ्याचदा तोंडावर पडतात आणि दात त्यांच्या ओठांवर लागतो आणि त्यानंतर रक्तस्त्राव होतो किंवा हिरड्यांना दुखापत होतो. अशा परिस्थितीत मुलांना थोडी साखर खायला द्या. यामुळे रक्तस्त्राव कमी होतो आणि मग डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कोरफडीचा गर

कोरफड ही केवळ त्वचा आणि केसांसाठी उत्तम घटक नसून तर ती जळजळ आणि सूज कमी करण्यासाठी तसेच काही कापल्या गेल्यावर देखील प्रभावी ठरते. कोरफडीचा गर कापलेल्या ठिकाणी आणि भाजलेला ठिकाणी लावता येतो यामुळे जळजळ होण्यापासून आराम मिळतो. सूज आल्यावर देखील कोरफडीचा गर गरम करून लावल्याने आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)