मुसळधार पावसानं बारामतीला झोडपलं आहे, पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे, जोरदार पाऊस झाला आहे.
मुसळधार पावसामुळे बारामतीमधील तीन इमारती खचल्या आहेत, दरम्यान आता एनडीआरएफचं पथक देखील घटनास्थळी दाखल होणार आहे.
खचलेल्या या इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. लवकरच या ठिकाणी एनडीआरएफचं पथक दाखल होण्याची शक्यता आहे.
दरम्यान या मुसळधार पावसाचा फटका हा बारामतीमधील वाहतुकीला देखील बसला असून, मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण झाली आहे.
सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर असून, कोणाच्याही जीवाला धोका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, काळजी घ्या असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील नागरिकांना केलं आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्येच पाऊस सुरू आहे, पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं आहे. या पावसामध्ये मोठं नुकसान झालं आहे.