तुमची मुलं एक मिनिटही मोबाईल सोडत नाहीत का? तर या ट्रीक्स तुमच्या नक्की कामी येतील

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बिल भरण्यापासून ते सोशल मीडियावर मित्र आणि कुटुंबाशी जोडले जाणे, स्मार्टफोनने आपले जीवन अधिक सुलभ केले आहे. परंतु, याच स्मार्टफोनचा अति वापर मुलांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.

मोबाईल गेम्स आणि सोशल मीडिया यामुळे मुलांची शारीरिक आणि मानसिक आरोग्याची स्थिती धोक्यात येत आहे. अभ्यासाच्या बाबतीत दुर्लक्ष होणे आणि शारीरिक वाढ मंदावणे हे त्याचे काही परिणाम आहेत. आजकाल मुलं खेळण्यासाठी मैदानावर न जाता मोबाईलच्या स्क्रीनवर जास्त वेळ घालवतात. पालकांसाठी ही एक गंभीर समस्या बनली आहे. जर तुमच्याकडेही अशाच प्रकारच्या चिंता असतील, तर काळजी न करता आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांना मोबाईलपासून दूर ठेवू शकता!

१. मुलांना मैदानी खेळांकडे वळवा

आपल्या मुलांना स्मार्टफोनपासून दूर ठेवायचे असेल, तर त्यांना मैदानी खेळांविषयी माहिती द्या. मैदानी खेळांमध्ये त्यांची रुची निर्माण करा. तुम्ही लहान मुलांना पोहणे, सायकलिंग, मार्शल आर्ट्स किंवा फुटबॉल, बास्केटबॉल, टेनिस यांसारख्या सांघिक खेळ खेळण्यास प्रोत्साहित करू शकता. यामुळे टे मोबाईल पासून दूर जातील आणि त्यांची शारीरिक क्षमता वाढेल. तसेच लहानपणीच त्यांच्यात सहकार्याची, प्रेमाची आणि समाजिकतेची भावना निर्माण होईल.

२. मोबाईल मुलांच्या नजरेपासून दूर ठेवा

मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी, शक्य तितका मोबाईल त्यांच्या नजरेपासून दूर ठेवा. विशेषतः झोपताना मोबाईल त्यांच्याजवळ ठेवू नका. तसेच, कमी वयात त्यांना स्वतःचा फोन घेऊन देऊ नका. कारण एकदा सवय लागली की ती तोडणे कठीण असते.

३. स्क्रीन टाइम मर्यादित करा

मुलांना पूर्णतः मोबाईलपासून दूर ठेवणे लगेच शक्य नाही. पण त्यांना मर्यादित वेळेसाठी मोबाईल देऊन त्यांचा स्क्रीन टाइम ठरवला जाऊ शकतो. त्यांच्यासाठी ठरावीक वेळ ठरवा आणि त्या वेळेतच मोबाईल वापरण्यास द्या. यामुळे ते हळूहळू मोबाईलचा कमी वापर करायला लागतील.

४. कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर भर द्या

अनेकदा मुलं एकटेपणा जाणवल्यामुळे मोबाईलकडे आकर्षित होतात. त्यामुळे पालकांनी मुलांसोबत वेळ घालवावा, त्यांच्याशी संवाद साधावा आणि घरात आनंदी वातावरण निर्माण करावे. यामुळे मुलं मोबाईलपेक्षा कुटुंबाला महत्त्व देतील.

५. स्वतःही मोबाईल कमी वापरा

जर तुम्ही स्वतः सतत मोबाईल वापरत असाल, तर तुमचं अनुकरण करत मुलंसुद्धा मोबाईलकडे वळतील. त्यामुळे मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी, तुम्हीही मोबाईलचा मर्यादित वापर करणे आवश्यक आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)