उन्हाळ्यात तुमचे हात टॅन झालेत, तर ते काढण्यासाठी ‘हे’ घरगुती मास्कचा करा वापर

उन्हाळा ऋतू आपल्यासोबत अनेक समस्या घेऊन येतो. विशेषतः या दिवसांमध्ये आपण आपल्या त्वचेची अधिक काळजी घेत असतो. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्ण वाऱ्यांमुळे त्वचेवर टॅन येणे सामान्य आहे. आपण अनेकदा चेहऱ्याच्या काळजीकडे जास्त लक्ष देतो आणि हातांकडे दुर्लक्ष करतो. पण आपल्या हातांनाही तितकीच काळजी घ्यावी लागते. थेट सूर्यप्रकाशामुळे हातांचा रंग गडद होतो, ज्यामुळे हाताची त्वचा कोरडी आणि काळी पडते.

तर अशावेळेस आपली त्वचा टॅन झाल्यावर टॅनिंग दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रोडक्ट देखील उपलब्ध आहेत. पण हे प्रोडक्ट खूप महाग असतात आणि कधीकधी त्यात असणाऱ्या कॅमिकलमुळे लोकं अशा प्रोडक्टचा वापर करणे टाळतात. अशा परिस्थितीत सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय म्हणजे घरगुती उपचार. घरात असलेल्या काही घटकांपासून बनवलेले मास्क केवळ टॅनिंग कमी करत नाहीत तर त्वचेला पोषण देतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. चला तर मग या लेखात आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी घरगुती मास्कबद्दल सांगणार आहोत जे उन्हाळ्यात टॅनिंगमुळे प्रभावित झालेल्या हातांचा रंग सुधारण्यास मदत करतील.

1. बेसन, हळद आणि दह्याचा मास्क

उन्हाळ्यात हातांचे टॅनिंग दूर करण्यासाठी बेसनाचा मास्क हा एक उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला 2 चमचे बेसन, 1 चिमूटभर हळद आणि 1 चमचा दही मिक्स करून पेस्ट तयार करावी लागेल. यानंतर त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. आता हा मास्क हातांना लावा आणि 20 मिनिटांनी हात धुवा. हा मास्क टॅनिंग नाहीसे करेल त्याचबरोबर त्वचेला मॉइश्चरायझ देखील करेल.

2. कोरफड आणि लिंबू मास्क

हातावरील टॅनिंग दुर करण्यासाठी 2 चमचे कोरफड जेल घ्या, त्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि पेस्ट बनवा. आता हे मिश्रण हातांवर आणि टॅन झालेल्या भागांवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. कोरफडीमुळे त्वचा थंड होईल. त्याच वेळी लिंबू टॅनिंग हलके करते.

3. बटाटा आणि गुलाब पाण्याचा मास्क

टॅनिंग दूर करण्यासाठी बटाटा देखील खूप फायदेशीर आहे. तुम्ही ते थेट तुमच्या हातावर देखील लावू शकता. अन्यथा किसलेल्या बटाट्यांमध्ये गुलाबपाणी मिक्स करा. हे मिश्रण हातांना लावा आणि कोरडे होऊ द्या. नंतर पाण्याने हात स्वच्छ धुवा. बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात जे त्वचेचा रंग उजळवतात.

4. टोमॅटो आणि मधाचा मास्क

टोमॅटो मॅश करा आणि त्यात मध टाका. ही पेस्ट हातांवर लावा आणि 20 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने हात धुवा. टोमॅटो सनटॅन काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी आहे आणि मध त्वचेला मॉइश्चरायझ करते.

5. काकडी आणि मुलतानी मातीचा मास्क

काकडी आणि मुलतानी मातीचा मास्क बनवण्यासाठी त्यात 2 चमचे काकडीचा रस आणि 1 चमचा मुलतानी माती मिक्स करून पेस्ट बनवा आणि हातांना लावा. सुकल्यानंतर कोमट पाण्याने हात धुवा. हा मास्क त्वचेला थंडावा देतो आणि टॅनिंग कमी करतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)