Banana bread is a great option for a healthy breakfastImage Credit source: tv9 marathi
खाण्याचा शौक असणाऱ्यांसाठी नाष्टा म्हणजे दिवसभराची ऊर्जा आणि ताजेतवानेपणा मिळवण्याचा उत्तम मार्ग! सकाळची सुरूवात हेल्दी आणि स्वादिष्ट नाश्त्याने झाली, तर दिवसभराची कामे अधिक उत्साहाने पार करता येतात. आणि जर तुम्ही ताजेतवाने, पौष्टिक आणि झटपट तयार होणारा नाष्टा शोधत असाल, तर “बनाना ब्रेड” हा एक शानदार पर्याय ठरू शकतो! फायबर, प्रथिने आणि आवश्यक पोषकतत्त्वांनी भरपूर असलेला हा ब्रेड अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येतो. चला तर मग, जाणून घेऊयात या पौष्टिक आणि स्वादिष्ट बनाना ब्रेडची रेसिपी!
बनाना ब्रेड बनवण्याची सोपी पद्धत
नाष्ट्यात रोज ब्रेड-बटर किंवा पराठा खाऊन तुम्ही सर्वजण कंटाळा असाल. तर आता काहीतरी वेगळं आणि हेल्दी ट्राय करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी बनाना ब्रेड हा उत्तम पर्याय आहे.
बनाना ब्रेडसाठी लागणारे साहित्य
२ केळी (मॅश केलेली)
१ कप गव्हाचे पीठ
१/२ कप गूळ पावडर किंवा मध
१/४ कप नारळ तेल किंवा तूप
१/२ कप दूध
१ चमचा बेकिंग पावडर
१/२ चमचा बेकिंग सोडा
१ चमचा दालचिनी पावडर
१ चमचा व्हॅनिला एसेंस
१/४ कप कापलेले अक्रोड किंवा बदाम
बनाना ब्रेड बनवण्याची प्रक्रिया
1. बनाना ब्रेड बनवण्यासाठी सुरुवातीला ओव्हन १८०°C वर प्रीहीट करा.
2. एका भांड्यात केळी चांगली मॅश करा.
3. त्यात गूळ पावडर (किंवा मध), नारळ तेल (किंवा तूप), दूध आणि व्हॅनिला एसेंस घालून व्यवस्थित मिक्स करा
4. दुसऱ्या भांड्यात गव्हाचे पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि दालचिनी पावडर चाळून घ्या.
5. आता तयार झालेल्या ओल्या आणि कोरड्या साहित्याचे मिश्रण करून मऊसर बॅटर तयार करा.
6. त्यात कापलेले बदाम किंवा अक्रोड घालून हलक्या हाताने मिक्स करा.
7. तयार बॅटर ग्रीस केलेल्या ब्रेड मोल्डमध्ये टाका आणि १८०°C वर ३५-४० मिनिटे बेक करा.
8. ब्रेड थंड झाल्यावर त्याचे स्लाइस करून नाष्ट्यात घ्या.
बनाना ब्रेडचे फायदे
बनाना ब्रेडमध्ये साखरेऐवजी गूळ वापरल्यामुळे ते अधिक हेल्दी बनते.
बनाना ब्रेडमध्ये भरपूर फायबर असते. तसेच ते अन्न पचनास मदत करते.
सकाळच्या नाष्ट्यासाठी बनाना ब्रेड योग्य पर्याय ठरू शकतो.