सध्या थंडीचा महिना सुरु झाला आहे. अशातच लोकांना थंडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी जायला प्रचंड आवडतं. जसं की मनाली, काश्मिर, शिमला वैगरे. कारण या मोसमात तिथे बर्फवृष्टी होत असते.
ज्यांना बर्फवृष्टी आणि बर्फाळलेले डोंगर पाहायचे असतील तर त्यांना या मोसमात काश्मिरची वारीही केलीच पाहिजे. देशातील मुख्य पर्यटन ठिकाणांपैकी एक म्हणजे जम्मू-काश्मीर आहे.
काश्मिरमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे. काश्मिर खोऱ्यातील भद्रवाह येथे चालू मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली.
तसेच गुलमर्गमध्येही बर्फवृष्टी झाली आहे.
काश्मिरमधल्या या मोसमातील पहिल्या पहिली बर्फवृष्टीचे फोटोज समोर आले आहेत
हे फोटो पाहून तुम्हाला नक्कीच असं म्हणावसं वाटेल की हे ‘जणू स्वर्गच’ आहे.
दरम्यान कुपवाडा जिल्ह्यातील माचिल आणि कर्नाह तसेच बांदीपोरा जिल्ह्यातील तुलैलमध्ये झालेल्या बर्फवृष्टीचा पर्यटकांनी मनसोक्त आनंद लुटला