उन्हाळ्यात लिंबूपाणी बनवताय? तर ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य

उन्हाळा सुरू होताच कडक उन्हाचा सामना करावा लागतो. त्यात या दिवसात अनेकजण थंड पेय पित असतात. तर उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये लिंबूपाणी बनवायला सुरुवात होते. हे एक सामान्य पेय आहे जे उन्हाळ्यात तुम्हाला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतेच पण तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता देखील दूर करते. उन्हाळ्यात लिंबू पाणी पिल्याने खूप आराम मिळतो. घशाला ओलावा देण्याव्यतिरिक्त, ते शरीराला थंड करते आणि आतून ऊर्जा प्रदान करते.

मात्र अनेकांना लिंबू पाणी योग्य पद्धतीने कसे बनवायचे हे माहित नसते, ज्यामुळे अनेकांचे आरोग्य देखील बिघडते. अशा वेळेस लिंबू पाणी योग्य प्रकारे कसे बनवायचे हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. तसेच लिंबूपाणी बनवताना लोक अनेकदा या 5 चुका करतात, या चुकांमुळे तुमचे आरोग्या बिघडु शकते. चला तर मग जाणून घेऊयात लिंबूपाणी बनवताना कोणत्या चुका टाळ्या पाहिजेत.

लिंबूपाणी बनवताना कोणत्या चुका टाळा?

1. बाजारातून आणलेले लिंबू न धुता थेट कापले तर त्यावरील धूळ आणि जंतू त्यांच्या आत शोषली जातात. यामुळे पोट बिघडू शकते किंवा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो. बाजारातून आणलेले लिंबू पाण्याने चांगले धुवावे आणि शक्य असल्यास कोमट पाणी वापरावे.

2. कधीकधी लोकं सकाळी कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवतात आणि संध्याकाळी तेच वापरतात. पण हे करणे योग्य नाही. कापलेल्या लिंबूमध्ये बॅक्टेरिया लवकर वाढतात, ज्यामुळे लिंबू पाणी पिल्यानंतर गॅस, उलट्या किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.

3. लिंबू पाणी संतुलित असेल तरच ते आरोग्यदायी असते. जास्त साखर टाकल्याने ते एका प्रकारच्या सरबतमध्ये बदलते, ज्यामुळे वजन वाढू शकते. त्याच वेळी जास्त मीठ टाकल्याने रक्तदाब वाढू शकतो. म्हणून मीठ आणि साखर चवीनुसार मिक्स करा.

4. लोकं अनेकदा लिंबूपाणी बाटलीत साठवतात, परंतु जर बाटली किंवा काच व्यवस्थित स्वच्छ केली नाही तर त्यात असलेले बॅक्टेरिया लिंबूपाणी खराब करू शकतात. यामुळे पोटदुखी किंवा अ‍ॅसिडिटी होऊ शकते.

5. जर लिंबूपाणी बनवून काही तास बाहेर टेबलावर ठेवले तर त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात, विशेषतः उन्हाळ्यात. यामुळे, लिंबू पाणी आंबट होऊ शकते आणि ते प्यायल्याने तुम्ही आजारी पडू शकता. नेहमी ताजे लिंबू पाणी बनवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)