आपण अनेकदा उशीरा अन्नाचे सेवन केल्याने पोटात गॅस तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे. पण उन्हाळ्यात ही समस्या खूप वाढते. कारण या दिवसांमध्ये वातावरणात आर्द्रता वाढल्याने पचनक्रियेवरही परिणाम होतो. अॅसिडिटीमुळे अस्वस्थता, छातीत जळजळ आणि पोट खराब होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत, कमकुवत पचनक्रियेमुळे, खाल्लेले किंवा प्यायलेले काहीही पचवणे कठीण होऊ शकते.
उन्हाळ्याच्या हंगामात पोटाची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. म्हणतात. बऱ्याचदा खाण्यापिण्यात निष्काळजीपणामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या देखील उद्भवते. म्हणून, तुमच्या आहारात दह्याचा समावेश नक्कीच करा. हे प्रोबायोटिक्सने समृद्ध आहे आणि पोट थंड ठेवते. पण जर तुम्हाला वारंवार अॅसिडिटीची समस्या येत असेल तर तुम्ही काही आयुर्वेदिक टिप्स फॉलो करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
जिरे आणि धणे पाणी
जिरे आणि धणे दोन्ही पचन सुधारतात. यामुळे अॅसिडिटी कमी होते. यासाठी तुम्ही जिरे आणि धणे या दोघांचे पाणी तयार करून प्यायल्याने तुम्हाला पोटाला थंडावा मिळतो. बद्धकोष्ठता, पोट फुगणे आणि पोटदुखीसाठी देखील हे पाणी खूप प्रभावी आहे. एक ग्लास पाण्यात 1 चमचा जिरे आणि 1चमचा धणे टाका आणि ते उकळवा. नंतर ते थंड करून गाळुन हे पाणी प्या.
बडीशेप आणि कोथिंबीर पाणी
बडीशेपचे सेवन पोटाला थंडावा देते. हे केवळ पोट थंड ठेवत नाही तर तोंडाची दुर्गंधी देखील दूर करते. जर तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि बडीशेपचे पाणी पिऊ शकता. एक ग्लास पाण्यात 1 चमचा बडीशेप आणि कोथिंबीर एकत्र करून चांगले उकळवा. त्यानंतर हे पाणी थंड झाल्यावर तुम्ही पिऊ शकता.
नारळ पाणी
नारळ पाणी आम्लपित्त कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहे. हे पचनसंस्थेला शांत करते. यामुळे चयापचय देखील वेगवान होतो. वजन कमी करण्यासाठी नारळ पाणी खूप फायदेशीर मानले जाते. दररोज एक नारळ पाणी प्यायल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
ओवा आणि गूळ
ओवा खाल्ल्याने पोटातील आम्लता कमी होण्यास मदत होते. अशातच ओवा आणि गुळाचे एकत्र सेवन केल्याने पोटातील गॅस आणि अॅसिडिटीची समस्या कमी होते. यासाठी 1 चमचा ओवा आणि गुळाचा एक छोटा तुकडा घेऊन त्याचे सेवन करा. यामुळे गॅसपासून लवकर आराम मिळतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)