तुला मुलगी झाली, घरी आलीस तर मी फास लावून घेईन आणि तुम्हाला अडकवीन, पतीची पत्नीला धमकी

Sangli Crime News : तुला मुलगी झाली आहे घरी आलीस तर मी फास लावून घेईन अशी धमकी पतीने दिली. त्याशिवाय विवाहितेचा माहेरुन २० तोळे सोनं आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ सासरच्यांकडून करण्यात आला.

Lipi

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : मुलगी झाली, पण तू घरी आली तर मी फास लावून घेईन आणि तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी धमकी पतीने पत्नीला दिली. तसंच वडिलाकडून २० तोळे सोने घेऊन ये, असे सांगून विवाहिता कोमल विशाल सावंत (वय २८, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा, सध्या रा. कार्वे, ता. खानापूर) हिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पती विशाल धोंडीराम सावंत, सासू संगीता धोंडीराम सावंत आणि दीर वैभव धोंडीराम सावंत (सर्व रा. मसुचीवाडी, ता. वाळवा) या तिघांविरुद्ध विटा पोलिसांत ७ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सासरच्या लोकांकडून शारीरिक, मानसिक छळ –

कार्वे येथील कोमल हिचा विवाह मसुचीवाडी येथील विशाल सावंत याच्याशी झाला होता. विवाहानंतर ३ मे २०२३ ते २ मे २०२४ या कालावधीत विवाहिता कोमल हिचा सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक छळ केला. संशयित पती, सासू आणि दीर यांनी संगनमताने तिला माहेरुन पैसे आणण्यास सांगितले. त्यांच्या घराचं अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी कोमल हिला माहेरहून पैसे आणण्यास सांगितल्यानंतर कोमल हिने नकार दिला. यानंतर कोमलच्या परस्पर, तिला काहीही न सांगता तिचे सोन्याचे दागिने बँकेत गहाण ठेवले. ते त्यांनी परत आणून दिले नाहीत.
Palghar News : प्रेयसीला नेपाळमधून आणलं, पालघरमध्ये नदीच्या पुलाखाली बांधून फेकलं; गोणीवरच्या मार्कने बॉडीचं गूढ उकललं

तुला मुलगी झाली, तु घरी आलीस तर मी फास लावेन, पतीची धमकी

विवाहिता कोमल हिने माझे सोन्याचे दागिने बँकेतून परत आणा, असे सांगिल्यानंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन वडिलांकडून २० तोळे सोने आण आणि ते त्यांच्याकडून घेतल्याशिवाय नांदायला येऊ नको, अशी धमकी दिली.

Sangli News : तुला मुलगी झाली, घरी आलीस तर मी फास लावून घेईन आणि तुम्हाला अडकवीन, पतीची पत्नीला धमकी; विवाहितेचा छळ

त्यादरम्यान कोमल हिला मुलगी झाली. ही बातमी मसुचीवाडीतील सासरच्या मंडळींना दिल्यानंतर पती विशाल सावंत याने तुला मुलगी झाली आहे, तू माझ्या घरी आलीस तर मी फास लावून घेईन आणि तुम्हा सर्वांना कायद्याच्या कचाट्यात अडकवीन, अशी पुन्हा धमकी देऊन तिचा शारिरीक आणि मानसिक छळ केला.
याप्रकरणी विवाहिता कोमल सावंत हिने सोमवारी विटा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार पती विशाल सावंत, सासू संगीता सावंत आणि दीर वैभव सावंत या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४९८ (अ), ५०४, ५०६, व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)