अलिकडे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली होती. त्याची तीव्र प्रतिक्रीया महाराष्ट्रात उमटली होती. कर्नाटकात जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेस पुढील आदेश मिळेपर्यंत बंद करण्याचा निर्णय लगोलग परिवहन मंत्र्यांनी घेतला होता. परंतू या घटनेनंतर कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या चालक आणि वाहकालाही बेळगावात काळे फासून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. परंतू या घटनेमुळे आता येत्या २२ मार्चला कर्नाटक बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राच्या एसटी चालक आणि वाहकाला मारहाण झाली होती. त्यानंतर बेळगावात देखील कर्नाटकच्या ( KSRTC ) कर्मचाऱ्यांना काळे फासल्याण्याची घटना घडली होती. या घटनेमुळे येत्या २२ मार्च रोजी कर्नाटक बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या २२ मार्च रोजी तुम्हाला बेळगाव किंवा कर्नाटकला जायचे असल्यास बसेस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्यानुसार नियोजन करावे लागणार आहे.
बेळगावमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ( KSRTC ) बस कंडक्टर आणि चालकाच्या तोंडाला काळे फासले होते. या घटनेनंतर कर्नाटकात मोठी प्रतिक्रीया उमटली होती. त्यानंतर कन्नड कार्यकर्ते वतल नागराज यांच्या नेतृत्वाखाली २२ मार्च रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे. त्यामुळे 22 मार्चला कर्नाटकात जात असाल तर सकाळी 6 ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बसेस आणि सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे.
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. परंतू महाराष्ट्रात कन्नड लोकांची कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा नाही. कर्नाटकात तमिल, तेलुगु, मारवाडी आणि मळ्याली लोकांची काय गरज आहे? कर्नाटकच्या वाहक आणि चालकांना काळे फासल्याचा विधानसभेत कोणी निषेध का केला नाही ? आमदार,लोकप्रतिनिधी मुकाट हे सहन करत आहेत. खाजगी शिक्षण संस्था, लुटारु कन्नड भाषा न शिकवण्याची भाषा करीत आहेत असा आक्षेप बंद पुकारणाऱ्या संघटनेचे नेते वतल नागराज यांनी केला आहे.