तुम्ही सुद्धा ‘या’ पद्धतीने सॅलड खाताय? तर तुमचे वजन कमी होणार नाही, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात अनेक बदल होत असतात. कारण रोजच्या धावपळीत आपण बाहेरच फास्टफूडचे जास्त सेवन करत असतो. तसेच कामाचा ताण अशा अनेक कारणामुळे अनेकाचे वजन वाढत चालेले आहे. यामध्ये वजन कमी करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आहारात बदल करत असतात. वजन कमी करताना काही लोकं दररोज सॅलड खाण्‍यास सुरूवात करतात. यामुळे फॅट लवकर बर्न होता. त्यातच सॅलडमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात पण त्यात कॅलरीज कमी असतात. अशावेळी आपल्यापैकी अनेकजण सॅलडला आहाराचा भाग बनवतात जेणेकरून वजन लवकर कमी होईल. मात्र कधीकधी सॅलडला आहाराचा भाग बनवल्यानंतरही वजन कमी होत नाही.

आहारतज्ञ मोहिनी डोंगरे यांच्या सांगण्यानुसार वजन कमी करण्यासाठी सॅलड खाणे हा एक आरोग्यदायी पर्याय मानला जातो कारण त्यात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. तथापि चुकीच्या पद्धतीने सॅलड खाल्ल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया थांबू शकते किंवा मंदावू शकते. अशातच चुकीच्या पद्धतीने सॅलड खाल्ल्याने वजन कमी होण्यास अडथळा कसा येऊ शकतो हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

प्रथिनांची कमतरता

वजन कमी करण्यासाठी प्रथिने खूप महत्वाची असतात. हे चयापचय गतिमान करते आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करते. जर सॅलडमध्ये पुरेसे प्रथिने नसतील तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते. यामुळे तुम्ही अति खाण्याचे बळी पडू शकता. प्रथिनांच्या कमतरतेमुळे स्नायूंच्या विकासावरही परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होऊ शकते.

फायबर आणि फॅटचा अभाव

काही लोकं सॅलडमध्ये फक्त लेट्यूस, काकडी आणि टोमॅटो सारख्या हिरव्या भाज्यांचा समावेश करतात. पण यामुळे शरीराला हेल्दी फॅट आणि फायबर मिळणार नाहीत. व त्याने तुम्हाला पुन्हा पुन्हा भूक लागेल. चांगल्या फॅट्स आणि फायबरसाठी, सॅलडमध्ये बीन्स, स्प्राउट्स, नट, बिया किंवा एवोकॅडो मिक्स करा.

जास्त कार्बोहायड्रेट

सॅलडमध्ये फक्त ताजी आणि हलकी हिरवी पाने असावीत, परंतु जर बटाटे, कॉर्न किंवा बीन्स सारख्या अधिक स्टार्चयुक्त भाज्या घातल्या तर त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप वाढू शकते. हे जास्त कार्बोहायड्रेट्स शरीरात साखरेची पातळी वाढवू शकत नाहीत तर ते शरीरातील इन्सुलिनच्या पातळीवर देखील परिणाम करतात, ज्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया मंदावते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)