कुंभमेळ्याला गेल्यावर नसेल खायचे बाहेरचे अन्न, तर हा पर्याय ठरेल सर्वोत्तम

कुंभमेळ्याची गणना जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये केली जाते. यावर्षी प्रयागराज मध्ये 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र संगमावर आशीर्वाद घेण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी लाखो भाविक उत्सवात उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्हीही जर महा कुंभामध्ये सहभाग घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. इथे जाण्यासाठी तुम्हाला खूप प्लॅनिंग करण्याची आवश्यकता आहे. कुंभमेळ्यात गेल्यानंतर तुम्ही तिथे काय खाऊ शकता आणि काय नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच तुम्हाला इथे कसे आणि कुठे राहायचे ही व्यवस्था तुम्ही तिथे जाण्या आधीच करणे गरजेचे आहे. सध्या जेवणाबद्दल बोलायचे झाले तर या काळात बरेच लोक बाहेरचे अन्न न खाण्यास पसंत करतात. त्यामुळे तुम्ही करून काही पदार्थ सोबत घेऊन जाऊ शकता.

महा कुंभमेळ्याला जाताना हे खाद्यपदार्थ ठेवा सोबत

जर तुम्हाला हे बाहेरचे अन्न खाणे पसंत नसेल तर तुम्ही प्रवास करताना घरातील काही छोट्या गोष्टी सोबत ठेवू शकतात. जेणेकरून तुम्हाला बाहेरचे अन्न खावे लागणार नाही आणि तुमची भूकही भागू शकेल. तर तुम्ही तुमच्या सोबत कोणत्या गोष्टी घेऊन जाऊ शकता ते जाणून घेऊ.

भिजवलेले कडधान्य

भिजवलेले कडधान्य खाण्याचे अनेक फायदे आहेत. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रवास करत असताना ते सहजपणे तुमच्या सोबत नेऊ शकता याचे आरोग्याला अनेक फायदे होतात. भिजवलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर जीवनसत्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. यामध्ये फायबर देखील चांगल्या प्रमाणात आढळते. यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि चयापचय आरोग्यास समर्थन देण्यास मदत करते.

सुकामेवा

सुकामेवा फायबर जीवनसत्वे आणि खनिजांचा चांगला स्त्रोत आहे. प्रवासात तुम्ही बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड यासारखा सुका मेवा तुमच्या सोबत ठेवू शकता. सुक्या मेवात नैसर्गिक चरबी आणि साखर असते ज्यामुळे हिवाळ्यात शरीर उबदार राहण्यास मदत होते. सुकामेवा हिवाळ्यात ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतो.

या गोष्टी सोबत ठेवा

प्रवासात तुम्ही तिळाचे लाडू, फळे, मैदा किंवा रव्याचे लाडू, सँडविच, सुक्या भाज्या, पराठा किंवा पोळी सोबत नेऊ शकता या घरगुती गोष्टी तुम्हाला बाहेरचे तळलेले पदार्थ खाण्यापासून वाचवतील आणि तुमचे पोट भरल्यामुळे तुम्ही कुंभमेळ्याचा आनंद घेऊ शकता.

या टिप्स लक्षात ठेवा

जर काही कारणास्तव तुम्हाला कडधान्य, सुकामेवा आणि शेंगदाणे यासारख्या गोष्टी सोबत घेऊन जाणे शक्य होत नसेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तळलेले अन्न खाण्याऐवजी घरी बनवलेले अन्न खा जर ते शक्य नसेल तर तुम्ही बाहेरचे हलके अन्न देखील खाऊ शकता. तुम्ही खिचडी, दही, फळे यासारख्या गोष्टींचे सेवन करून तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतात. याशिवाय तुम्ही पाणी पीत राहा त्यामुळे पाण्याची बाटली आवश्यक सोबत ठेवा.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)