पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर ‘या’ 5 गोष्‍टी माहित असणे आवश्यक

मेकअप केल्याने सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अशातच काहीजणींना रोज मेकअप करायला आवडते, तर काही महिला या काही कार्यक्रमानुसार मेकअप करतात. अशा परिस्थितीत प्रत्येकाला नेहमीच पार्लरमध्ये जायला जमत नाही. अशातच काही महिला अशा आहेत ज्या अधूनमधून मेकअप करतात त्यांना त्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी माहित असायला हव्यात जेणेकरून त्यांना परिपूर्ण लूक करता येईल. कधीकधी योग्य माहितीच्या अभावामुळे मेकअपमधील छोट्या चुकांमुळे चेहऱ्यांचे सौंदर्य वाढवण्याऐवजी खराब दिसू शकतो. लिपस्टिक आयशॅडो किंवा लाइनरपेक्षा मेकअप बेसबद्दल माहिती असणे महत्त्वाचे आहे. यासाठी ज्या महिला म्हणा किंवा मुली या पहिल्यांदा मेकअप करतात. त्यांना काही गोष्टींची महिती असणे आवश्यक आहे.

मेकअप करणे काही लोकांना सोपे वाटत असले तरी, ती एक कला आहे जी शिकण्याची गरज आहे. सध्या जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल जे अधूनमधून मेकअप करतात किंवा तुम्हाला काही प्रसंगी पहिल्यांदाच मेकअप करावा लागत असेल, तर कोणत्या मूलभूत गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घ्या.

त्वचेच्या योग्य बेससाठी परफेक्ट फाउंडेशन कसे निवडायचे

मेकअप केल्यानंतर चेहरा नॅचरल दिसण्यासाठी, परिपूर्ण फाउंडेशन निवडणे महत्वाचे आहे. तुमच्या स्किन टोननुसार जुळणारे फाउंडेशन निवडा. डार्क स्किन असल्यास तुम्ही जर लाइट फाउंडेशन तसेच लाइट स्किन टोन साठी तुम्ही डार्क रंगाचा फाउंडेशन वापरत असाल तर अशाने दोन्ही परिस्थितीत तुमचा चेहरा खराब होईल. यासाठी तुम्ही जेव्हा फाउंडेशन खरेदी कराल तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावर, मानेवर किंवा हातांवर लावण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला फाउंडेशनचा योग्य टोन समजेल.

मेकअपसाठी तुमचा चेहरा कसा तयार करायचा

सर्वात आधी चेहरा धुवा. यानंतर, क्लीन्सरने पुन्हा चेहरा स्वच्छ करा. आता चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. लक्षात ठेवा की जर तुमची त्वचा तेलकट असेल तर वॉटर बेस्ड किंवा जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावा. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर निवडा.

मॉइश्चरायझर लावल्यानंतरची दूसरी स्टेप

चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावल्यानंतर 10 सेकंद थांबा जेणेकरून त्वचा ओलावा योग्यरित्या शोषू शकेल. यानंतर प्रायमर वापरा. या दोन्ही गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन बेस योग्यरित्या मिसळण्यास मदत करतात. यामुळे मेकअप केल्यानंतर बेस तडकत नाही.

मेकअपचा तिसरी स्टेप

जर तुम्हाला आयशॅडो लावायचा असेल तर फाउंडेशन लावण्यापूर्वी डोळ्यांचा मेकअप करा. डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर गरज असेल तिथे कलर करेक्टर लावा, कन्सीलर लावा आणि नंतर डोळ्यांचा मेकअप करा. यानंतरच फाउंडेशन लावावे. यामुळे, जर शॅडो, लाइनर, मस्कारा यासारख्या गोष्टी चेहऱ्यावर पडल्या तर त्या फाउंडेशनने झाकल्या जातात.

फाउंडेशन ब्लेंड करण्याचा योग्य मार्ग

तुमचा मेकअप बेस चांगला राहण्यासाठी फाउंडेशन योग्य प्रकारे चेहऱ्यावर ब्लेंड होण महत्वाचे आहे. चेहऱ्यावर खूप कमी किंवा जास्त फाउंडेशन लावू नका हे लक्षात ठेवा. संपूर्ण चेहऱ्यावर चांगले कव्हरेज मिळावे म्हणून मर्यादित प्रमाणात फाउंडेशन लावा. यानंतर, ब्युटी ब्लेंडरने टॅप करून फाउंडेशन पसरवा. या टप्प्यावर, ब्लेंडर चेहऱ्यावर अजिबात घासू नका. जर तुम्ही पहिल्यांदाच मेकअप करत असाल तर ब्युटी ब्लेंडर पाण्यात भिजवा, चांगले पिळून घ्या आणि हवेत सुकू द्या. जेव्हा त्यात पाणी शिल्लक नसेल आणि थोडासा ओलावा असेल, तेव्हा त्यात त्वचेवरील बेस ब्लेंड करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)