घरासाठी पाण्याची टाकी खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. टाकीच्या आकारावर आणि किमतीवर विचार करणे सामान्य आहे, पण याव्यतिरिक्त टाकीच्या मटेरियलची गुणवत्ता, रंग, आणि टाकीचे UV संरक्षण यांसारख्या गोष्टी महत्वाच्या ठरतात. पाणी साठवताना त्याची सुरक्षितता, स्वच्छता आणि पाणी थंड ठेवणारी क्षमता या सर्व बाबींचा विचार करणं आवश्यक आहे.
टाकीचं मटेरियल कशापासून बनलेलं आसतं?
पाण्याची टाकी खरेदी करतांना सर्वात आधी त्याचं मटेरियल तपासणं महत्त्वाचं आहे. अनेकदा प्लास्टिकच्या टाक्या विकल्या जातात, पण त्या ‘फूड-ग्रेड’ असाव्यात, याची खात्री करा. जर टाकी स्टेनलेस स्टीलची असेल, तर ती जास्त टिकाऊ आणि स्वच्छ असते, पण किंमतीत थोडी जास्त असू शकते. प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये मल्टी-लेयर्स असलेल्या टाक्या उत्तम ठरतात, कारण त्या पाणी थंड ठेवण्यास मदत करतात आणि जास्त मजबुती देतात.
आरोग्याच्या दृष्टीने रंग आणि आकार कसा असावा?
टाकीची योग्य क्षमता ठरवताना, घराच्या लोकसंख्येचा आणि त्यांचं पाणी वापरण्याचं प्रमाण लक्षात घ्या. टाकीच्या आकारावरच जास्त लक्ष दिलं जातं, पण रंग देखील महत्त्वाचा आहे. गडद रंगाच्या टाक्या अधिक तापतात आणि त्यामध्ये असलेलं पाणी गरम होऊ शकतं. पांढऱ्या किंवा इतर हलक्या रंगाच्या टाक्या उन्हातील उष्णता कमी शोषतात, ज्यामुळे पाणी थंड राहतं. तसेच, UV संरक्षण असलेली टाकी निवडणं सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
ब्रँड आणि गुणवत्ता कशी ओळखाल?
बाजारात विविध ब्रँड्सच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध आहेत, पण प्रत्येक ब्रँडची गुणवत्ता समान नसते. त्यामुळे, विश्वासार्ह ब्रँड निवडणे आणि त्यावरचे ISI मार्क आणि प्रमाणपत्र तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच, टाकीवर वॉरंटी असावी, म्हणजे त्यावर कंपनीला स्वतःचा विश्वास आहे असं मानलं जातं. ब्रँडच्या विश्वसनीयतेसाठी लोकांच्या पुनरावलोकनांवरही विश्वास ठेवा.
टाकीची साफसफाई आणि देखभाल देखील महत्त्वाची आहे. त्या सोयीच्या डिझाईनची निवड करा, ज्यामुळे साफसफाई करणं सोपं जाईल. याशिवाय, तुम्हाला योग्य आणि टिकाऊ टाकी खरेदी करतांना तुमच्या बजेटनुसार योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचं आहे. ब्रँड्स आणि मॉडेल्सच्या किमतींची तुलना करा आणि त्यानुसार निर्णय घ्या.