उन्हाळ्यात AC वापरताना वीज बिलाची भीती वाटते? तर ‘या’ 5 ट्रिक येतील कामी

उन्हाळ्याचा हंगाम सुरू झाला असून उन्हाळ्यात एसी वापरणे सामान्य आहे.ज्याचा अर्थ घरामध्ये आता वीज बिल जास्त येण्याची शक्यता आहे. कारण या काळात घरामध्ये दिवस-रात्र एसी सुरू असतो. पण तुम्ही जर काही खास पद्धतींचा अवलंब केला तर एसीच्या वापरामुळे येणारे वीज बिल कमी करता येते किंवा मेटेंन करता येते. येथे आम्ही तुम्हाला अशा 5 ट्रिक सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही एसी तासंतास वापरला तरीही जास्त बिल येणार नाही.

एसी सेटिंग्ज योग्य करा

एसीचा टेंम्परेचर सेटिंग्ज योग्य पद्धतीने वापरल्यास विजेचा वापर कमी होऊ शकतो. बहुतेक लोकं एसी खूप कमीटेंम्परेचरवर सेट करतात. ज्यामुळे जास्त वीज वापरले जाऊ शकते. एसी 24-26 ​​डिग्रीवर सेट करावा. यामुळे खोली थंड राहते आणि विजेचा वापर कमी होतो.

एसी फिल्टर वेळेवर स्वच्छ करा

एसी फिल्टरवर धूळ साचल्यामुळे त्याच्या हवेचा प्रवाह कमी होतो. त्यामुळे एसीवर दबाव कमी आल्याने विजेचा वापर वाढतो. म्हणून, दर महिन्याला एसी फिल्टर पूर्णपणे स्वच्छ करा किंवा बदला. यामुळे एसीची कार्यक्षमता चांगली राहते. वीज बिल कमी आणि देखभालीचे राहते.

खोलीतील एसीच्या वेंटिलेशनकडे लक्ष द्या

एसीचा एअरफ्लो योग्य दिशेने असावा. जर खिडक्या किंवा दरवाजे उघडे असतील तर गरम हवा आत येऊ शकते. त्यामुळे एसी थंड होण्यास वेळ लागतो. म्हणून, अशा वेळेस खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा. एसीच्या व्हेंटिलेशनकडे लक्ष दिले पाहिजे.

पंखा वापरा

तुम्ही जर एसी वापरत असाल तर खोलीत पंखा लावला असे केल्याने थंडावा वाढतो आणि एसीवर जास्त दाब पडत नाही. खोली जास्त काळ थंड राहते. यामुळे खोलीचे तापमान सामान्य राहते. व एसीवरील भार कमी होतो.्र

योग्य वेळी एसी बंद करा

कधीही एसी विनाकारण चालू ठेऊ नका. जर तुम्ही खोलीत नसाल तर एसी बंद करावा. अशा परिस्थितीत, खोलीचे तापमान थंड झाल्यावर, एसीची सेटिंग्ज वाढवा. जर तुम्हाला रात्री सौम्य थंडावा हवा असेल तर एसीचा टायमर सेटिंग वापरा, जेणेकरून काही वेळाने एसी आपोआप बंद होईल. यामुळे वीज वापरावर नियंत्रण राहते.

एसी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वीज बिल कमी आणि व्यवस्थित राहील. यामुळे वीज बिल वाढण्याची शक्यता कमी होते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)