तुम्हालाही श्रीमंत व्हायचं आहे? मग या तीन गोष्टींचा करा त्याग

अनेक जणांना असे वाटत असते की आहे त्या परिस्थितीपेक्षा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असावी. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात श्रीमंत होण्याचा स्वप्न पाहत असतो. अनेक जण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करतात तर काही जण देवाची पूजा करून श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकालाच श्रीमंत होणं शक्य नसते श्रीमंत होण्यासाठी काय केले पाहिजे आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजे याकडे सर्वप्रथम लक्ष देणे गरजेचे आहे. श्रीमंत होण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजे तर काही गोष्टी केल्या पाहिजे. श्रीमंत होण्याच्या मार्गापासून ज्या गोष्टी तुम्हाला दूर नेतात त्या गोष्टी प्रामुख्याने करणे टाळले पाहिजे. विसाव्या शतकातील महान संत आणि चमत्कारिक बाबा म्हणून ओळख असलेले गुरु नीम करोली बाबा यांनी सांगितले होते की एखाद्या व्यक्तीने कोणत्या कृती करणे टाळले पाहिजे जेणेकरून ते अल्पावधीतच श्रीमंत होऊ शकतात.

विसाव्या शतकातील हनुमान म्हणून ओळख असणारे नीम करोली बाबा यांनी काही वर्षांपूर्वीच श्रीमंत होण्यासाठी कोणती कामे केली पाहिजे ते सांगितले आहे. 21व्या शतकातील लोकांनी स्वतःला श्रीमंत बनवण्यासाठी कोणती कामे करणे टाळली पाहिजेत याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या नीतीमध्ये केला आहे. जाणून घेऊया ती कोणती कामे आहे जी कामे करणे श्रीमंत व्यक्ती टाळतात. नीम करोली बाबांच्या मते श्रीमंत होण्यासाठी व्यक्तीने तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे तरच तो व्यक्ती श्रीमंत बनू शकतो.

या तीन गोष्टींमधली पहिली गोष्ट म्हणजे अहंकार. अहंकार सोडणे ही प्रत्येक माणसासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ अहंकाराशिवाय माणूस स्वतःला कमी वेळात यशस्वी बनू शकतो आणि ते यश आयुष्यभर आपल्या सोबत घेऊन जाऊ शकतो. दुसरी गोष्ट आहे संसारिक मोह नीम करोली बाबांच्या मते जो व्यक्ती संसारिक मोह सोडून देतो तोच व्यक्ती श्रीमंत होऊ शकतो. संसारिक वचनांमध्ये अडकलेला माणूस कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे श्रीमंत होण्यासाठी संसारिक मोह सोडणे अत्यंत आवश्यक आहे.

नेटवर्क, इंटरनेटशिवाय कॉल करणे शक्य, फक्त ‘हे’ काम करा

Image

Elon Musk Networth : जगाची तोंडात बोटं, एलॉन मस्क याने खोऱ्याने जमवली माया, तोडले सर्व रेकॉर्ड, पैशांचा बदाबदा पडला पाऊस

Image

Cancer Medicine : मोठी आनंदवार्ता, कॅन्सर छुमंतर होणार, रामबाण औषधाचा पर्याय, काय आहे रशियाचा दावा, किंमत वाचून दंग व्हाल…

Image

Divorce : लग्न कसले हा तर भातुकलीचा खेळ; या देशांमध्ये घटस्फोटाचा ट्रेंड; भारतातही जोडप्यांचे तुझे-माझे जमेना, विभक्त झाल्याविना करमेना

शेवटची गोष्ट नीम करोली बाबांनी सांगितल्याप्रमाणे जो कोणी व्यक्ती मनात राग ठेवतो किंवा इतरांचा अपमान करण्याची भावना मनात ठेवतो तो व्यक्ती कधीही श्रीमंत होऊ शकत नाही. असे म्हणतात की तुम्ही ज्या पद्धतीने विचार करता त्या विचाराचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो. यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मनात राग किंवा अपमानाची भावना असेल तर त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर देखील होतो. इतरांचा अपमान करण्याची भावना आणि मनात राग ठेवणारी व्यक्ती कधीही स्वतःला यशस्वी किंवा श्रीमंत बनवू शकत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे त्या व्यक्तीने या तीन गोष्टींचा त्याग केला पाहिजे जेणेकरून तो एक यशस्वी आणि श्रीमंत व्यक्ती बनू शकेल.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)