जर शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर तोंडाचा कर्करोग असू शकतो; कसं ओळखाल?

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. कोणत्याही एका विशिष्ट लक्षणाच्या आधारे तुम्हाला तोंडाचा कर्करोग आहे असे म्हणता येणार नाही. पण त्यासाठी नेमकं कसं ओळखायचं की तुम्हाला तोंडाचा कॅन्सर आहे की नाही आणि त्याची लक्षणे आणि चिन्हे काय असू शकतात ते जाणून घेऊयात.

तोंडाचा कर्करोग म्हणजे काय?
तोंडाचा कर्करोग हा सुरुवातीला ओळखू येणारा नसतो किंवा तो तोंडाच्या सामान्य आजारांप्रमाणेच वाटू शकतो. जसं की तोंड येणे, घसा दुखणे, किंवा तोंडात जखमा होणे आणि त्यातून हलकं हलकं रक्त येणे. अशा काही लक्षमांवरून ते तोंडाचं इन्फेक्शन असेल असं वाटू शकतं पण हीच ,समस्या पुढे जाऊन गंभीर बनते आणि तोपर्यंत हा कर्करोग तुमच्या शरीरात पसरू शकतो. तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त सुमारे 63% लोक निदान झाल्यानंतरही पाच वर्ष जगतात.

तोंडाचा कर्करोग तुमच्या तोंडावर आणि तुमच्या ऑरोफॅरिन्क्सवर परिणाम करू शकतो. तुमच्या ऑरोफॅरिन्क्समध्ये तुमच्या जिभेचे भाग, तोंडाचा वरचा भाग आणि घशाचा मधला भाग समाविष्ट असतो जो तुम्ही तोंड पूर्णपणे उघडल्यावर दिसतो. तुमच्या ऑरोफॅरिन्क्समधील कर्करोगाला ऑरोफॅरिन्जियल कर्करोग म्हणतात.

तोंडाच्या कर्करोगाची संभाव्य चिन्हे आणि लक्षणे

ओठांवर किंवा तोंडावर असे फोड येतात जे काही आठवड्यांत बरे होत नाहीत

गाठ किंवा जाड होणे: ओठ, तोंड किंवा गालावर गाठ किंवा जाड होणे

हिरड्या, जीभ, टॉन्सिल किंवा तोंडाच्या आतील भागात पांढरे किंवा लाल डाग येतात

चावण्यास, गिळण्यास किंवा बोलण्यास त्रास होणे, चावण्यास, गिळण्यास किंवा जबडा, जीभ हलविण्यास त्रास होतो

जीभ, ओठ किंवा तोंडाच्या इतर कोणत्याही भागात सुन्नपणा किंवा वेदना जाणवते जी पटकन दूर होत नाही

दात सैल होते किंवा दातांभोवती वेदना होते

जबड्यात सूज किंवा वेदना होतात

आवाजात बदल होतो. कर्कश आवाज किंवा इतर स्वरात बदल होऊ शकतो

मानेच्या किंवा घशाच्या मागच्या बाजूला गाठ जाणवू शकते

कोणत्याही ज्ञात कारणाशिवाय वजन कमी होणे

ही काही तोंडाच्या कर्करोगाची कारणे आहेत. पण यापैकी किंवा तोंडाच्याबाबतीत काहीही दुखणं तुम्हाला जाणवलं तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)