उन्हाळ्यात घामामुळे खाज सुटण्याच्या समस्येने त्रस्त आहात? तर ‘या’ टिप्स करा फॉलो

एप्रिल महिन्यात सुद्धा उष्णतेचा पारा झपाट्याने वाढत आहे, वाढत्या उष्णतेमुळे प्रत्येकाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात आरोग्यासोबतच त्वचेशी संबंधित समस्यही वाढत आहेत. कारण उष्णता आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्याला जास्त घाम येतो. ज्यामुळे केवळ दुर्गंधीच नाही तर त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्यांना निर्माण होतात.

घाम आणि ओलावा यामुळे शरीरावर खाज सुटणे सामान्य आहे. पण यामुळे केवळ जळजळ होत नाही, तर या समस्येची वेळे आधीच काळजी घेतली नाही तर त्वचेशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ शकतात. उन्हाळ्यात घामामुळे येणाऱ्या खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

उन्हाळ्याच्या दिवसात योग्य कपडे घाला

उन्हाळ्यात अनेकांना खूप घाम येतो. म्हणून असे कपडे घाला जे घाम लवकर शोषून घेतात. कॉटन, रेयॉन आणि शिफॉनसारखे कापड घाम सहज शोषून घेतात. यासोबतच, अर्ध्या बाह्यांचे आणि लाईटवेट ड्रेस घाला.

शरीर हायड्रेटेड ठेवा

कडक उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्या. काकडी, टरबूज, ताक, लिंबूपाणी आणि बेलफळाचे ज्यूस यासारखे पदार्थांचे सेवन करा. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील. कारण या दिवसांमध्ये डिहायड्रेशनमुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि यामुळे खाज सुटू शकते. हायड्रेटेड राहिल्याने त्वचा देखील मॉइश्चराइज्ड राहील.

कोरफड जेल

कोरफड जेल त्वचेला थंड करण्याचे काम करते. अशा वेळी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला कोरफड जेल लावू शकता. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास देखील मदत करते.

स्किन केअर प्रॉडक्ट

तुमच्या त्वचेच्या टोननुसार योग्य स्किन केअर प्रॉडक्ट निवडा. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर जेल किंवा वॉटर बेस्ड क्रीम आणि एसपीएफ लावा. ज्यामुळे तेल आणि घाम कमी दिसतो.

नारळाचे तेल

तुमची त्वचा जर खूप कोरडी असेल आणि तुम्हाला खाज सुटण्याची समस्या असेल तर तुम्ही नारळ तेल वापरू शकता. त्यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेतील बॅक्टेरिया काढून टाकून खाज कमी करण्यास मदत करू शकतात. शिवाय, ते त्वचेला ओलावा आणि पोषक तत्वे दोन्ही प्रदान करेल.

तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा

उन्हाळ्यात दुपारी सूर्य खूप तीव्र असतो. म्हणूनच, जर तुम्हाला आधीच त्वचेची समस्या असेल किंवा तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल, तर यावेळी बाहेर जाणे टाळा. याशिवाय, जर खाज सुटणे आणि लालसरपणा वाढत असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)