घरात गॅस सिलेंडर संपल्यावर लगेच नवीन सिलेंडर बुक करणं आता खूप सोपं झालंय. फोन, ॲप किंवा व्हॉट्सॲपवर एक मेसेज पाठवला की काही वेळात गॅस सिलेंडर घरपोच येतो. पूर्वीप्रमाणे गॅस एजन्सीच्या कार्यालयात रांगेत उभं राहण्याची गरज उरलेली नाही. पण या सोयीचा लाभ घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे, ती कोणती तेच आपण आज जाणून घेऊया.
मोबाईल नंबर लिंक असायला हवा
जर तुमचा मोबाईल नंबर गॅस एजन्सीच्या नोंदणीत नसला, तर ऑनलाइन बुकिंग करता येत नाही. कारण तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमची ओळख पटवते. आणि नंबर लिंक नसेल तर ऑनलाइन बुकिंग अडते आणि मग तुम्हाला गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये जाऊन प्रत्यक्ष बुकिंग करावं लागतं. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाया जाते.
मोबाईल नंबर लिंक कसा करायचा?
हे काम अगदी सोपं आहे. तुम्ही एकदा तुमच्या गॅस एजन्सीच्या कार्यालयात भेट द्या. तिथे तुमचा ग्राहक क्रमांक ( Customer ID ) आणि मोबाईल नंबर देऊन तुमचं नंबर अपडेट करण्याची विनंती करा. काही मिनिटांतच तुमचा नवीन मोबाईल नंबर त्यांच्या सिस्टिममध्ये नोंदवला जाईल.
मोबाईल नंबर लिंक झाल्यानंतर तुम्ही पुन्हा सहजतेने घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करू शकता. त्यामुळे मोबाईल नंबर लिंक करून ठेवणं खूप गरजेचं आहे.
नोंदणीकृत मोबाईल नंबर बदलला तर काय कराल ?
जर तुम्ही नवीन मोबाईल नंबर घेतला असेल किंवा जुना नंबर बंद झाला असेल, तर लगेच गॅस एजन्सीला नवीन नंबर अपडेट करून द्या. यामुळे पुढे कोणतीही अडचण येणार नाही आणि तुमचं गॅस बुकिंग सतत सुरळीत राहील.