माजी मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुणे विमातळावरुन बेपत्ता झाला आहे. सोमवारी दुपारपासून तो नॉट रिचेबल झाला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या शोधासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाले नाही. तो न सांगता गेल्यामुळे आम्ही चिंताग्रस्त झाला आहोत, असे स्पष्ट केले. आता या प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. ऋषीराज बँकॉककडे खासगी विमानाने निघाला होतो, अशी नवीन माहिती समोर आली आहे.
काय म्हणाले तानाजी सावंत
शिवसेना नेते तानाजी सावंत म्हणाले की, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते.
भारताच्या या जातीच्या गाईने तोडले जगातील सर्व विक्रम, 40 कोटींमध्ये विक्री, गिनीज बुकात नोंद

भारत 1, ब्राझील 2…,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल

बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर

50 हजारांचे एक कोटी करणारा हा शेअर, 10 वर्षांत 22,100 टक्के रिटर्न, कधी किंमत होती 2 रुपये
ऋषीराज मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. परंतु तो दुपारीपासून नाही. त्याने मला किंवा त्याच्या भावालाही काहीच सांगितले नाही. तसेच त्याने त्याची गाडी वापरली नाही. दुसऱ्याच्या गाडीने तो गेला आहे. त्याने फोनसुद्धा केला नाही. त्यामुळे तो पुणे विमानतळावर कसा गेला? हा प्रश्न आम्हा कुटुंबियांना पडला. मुलासाठी आम्ही चिंताग्रस्त झाल्यामुळे पोलिसांना कळवले आणि तपास सुरु झाला आहे.
मुलाबाबत गाडी चालकाने दिली माहिती
मुलगा विमानतळावर गेला, ही माहिती तुम्हाला कशी मिळाली त्यासंदर्भात बोलताना तानाजी सावंत म्हणाले, तो ज्या गाडीने विमानतळावर गेला, त्या गाडीच्या चालकाने आम्हाला ही माहिती दिली. चालकही घाबरलेला आहे. तो म्हणाला मी त्याला विमानतळावर सोडून आलो. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र होते. परंतु ते कोण होते, त्याची माहिती आम्हाला नाही. तसेच तो कुठे गेला त्याची माहिती नाही. तो ज्या विमानाने गेला ते विमान चार्टड आहे की नियमित विमान यासंदर्भात कोणती माहिती अजून नाही, असे तानाजी सावंत यांनी सांगितले.